Search This Blog

Wednesday 5 April 2023

1 एप्रिल ते 1 मे कालावधीत सामाजिक न्याय पर्व अभिनव उपक्रमाचे आयोजन

 


1 एप्रिल ते 1 मे कालावधीत सामाजिक न्याय पर्व अभिनव उपक्रमाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 05 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर मार्फत समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनात व नियोजनानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये 1 एप्रिल ते 1 मे 2023 या महिनाभराच्या कालावधीत विविध कार्यक्रम व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय पर्व हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कालावधीत सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे. 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 दरम्यान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे, महाविद्यालय, आश्रमशाळा, निवासी शाळा व शासकीय वस्तीगृहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुका व जिल्हास्तरावर स्वाधार, शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर लाभार्थी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेचे लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्तरावर साहित्य वाटप करणे व योजनांची माहिती देणे, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी कार्यशाळा आयोजनाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी, सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे, पुनम आसेगावकर, वरिष्ठ लिपिक मंगेश कोडापे, संजय बन्सोड, सजल कांबळे, संदीप वाढई, आदी कर्मचारी उपस्थित होते.

०००००

No comments:

Post a Comment