आदिवासी प्रशिक्षणार्थींना स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन
चंद्रपूर, दि.21 : आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उघोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रातील सन 2023-24 मधील पहिल्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प श्री. मुरुगानंथम (भा. प्र.से.) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि स्थानिक भरती परिक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले . त्यात त्यांनी यशस्वी होण्याचे 10 सुत्री मुद्दयांवर भर दिला.
यावेळी या कार्यालयातर्फ संविधान पुस्तिका व सन्मान चिन्ह देवून श्री. मुरुगानंथम यांचे स्वागत करण्यात आले. तसेच या कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख भाग्यश्री वाघमारे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी या कार्यालयाची माहिती दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या केंद्रात घेण्यात आलेल्या आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारीत प्रश्नमंजुषा व संविधात पुस्तिकेवर आधारीत स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय पारितोषिक देण्यात आले . तसेच साडेतीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण होऊन WCL चंद्रपूर येथे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक या वर्ग तीन च्या पदावर नोकरी प्राप्त प्रतीभा डडमल यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन श्री. गराटे यांनी केले. यावेळी श्री. भगत, श्री. गौरकार व इतर शिक्षक उपस्थित होते.
0000000
No comments:
Post a Comment