Search This Blog

Monday, 10 April 2023

सहकार क्षेत्रात जुनासुर्ला अग्रेसर व्हावे : पालकमंत्री मुनगंटीवार




 

सहकार क्षेत्रात जुनासुर्ला अग्रेसर व्हावे : पालकमंत्री मुनगंटीवार

Ø प्रतिकार नागरी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण

चंद्रपूर, दि. 10 : 'विना सहकार नाही उद्धार', असे म्हटले जाते. जुनासुर्ला येथील प्रतिकार नागरी सहकारी पतसं‌स्थेच्या माध्यमातून गावातील सहकार चळवळ मजबूत व्हावी आणि जुनासुर्ला सहकाराच्या बाबतीत अग्रेसर व्हावे, असा शुभेच्छा राज्याचे वनसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

जुनासुर्ला येथील प्रतिकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तू लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिरदेवराव भोंगळेहरीश शर्माअल्का आत्राम, चंदू मारगोनवारप्रभाकर भोयरअमोल चुदरीसंजय येनुरकरपतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश जिल्हावारउपाध्यक्ष परशुराम नाहगमकरमानद सदस्य माणिक पाटेवारवासुदेव समर्थ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. मुनगंटीवार म्हणाले कीजुनासुर्ला येथे अत्याधुनिक सुविधा असलेल्या पतसंस्थेचे कार्यालय उभे झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो. एखाद्या कार्पोरेट बँकेच्या इमारतीलाही लाजवेल, अशी ही सुसज्ज पतसंस्थेची इमारत आहे. प्रतिकार पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील शोषितवंचितांना मदत मिळावी. त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता दूर होईल. या भागातील  लोकांना पतपुरवठा कमी पडत असेल तर प्रतिकार पतसंस्थेने अशांची मदत करावी, अशी अपेक्षाही श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

सहकार क्षेत्राला मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात प्रथमच सहकार मंत्री हे पद निर्माण केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या पदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. केंद्र सरकारने प्रथमच मत्स्य आणि सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. त्यामुळे देशात आता नीलक्रांती आणि सहकार क्रांती होणार हे निश्चित असल्याचेही ते म्हणाले. चंद्रपुरातील नागरिकांनीही मत्स्यसंवर्धन आणि सहकार क्रांतीत सहभागी व्हावे, असे अवाहनही श्री. मुनगंटीवार यांनी केले.

निधी कमी पडू देणार नाही  : जुनासुर्ला गावातील विकासासाठी आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहाच्या उभारणीसाठी मदत केली. रस्त्यांचा विकास करण्यात आला. गावाच्या विकासाबाबत केलेली मागणी नक्की पूर्ण करू अशी ग्वाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

००००००

No comments:

Post a Comment