Search This Blog

Wednesday 12 April 2023

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम

 

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम

Ø नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.12 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय पर्व राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 14 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment