Search This Blog

Monday, 24 April 2023

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1) व (3) लागू

 


जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1) व (3) लागू

चंद्रपूरदि. 24 : जिल्ह्यात राजकीय पक्षकामगार संघटनांचे आंदोलनजातीय सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारे आंदोलननिदर्शनेमोर्चाअतिमहत्वाचे व्यक्तीचा दौरा तसेच सध्या देशात व राज्यातील चालू घडामोडी संबधाने तसेच जिल्ह्यात होणारी विविध राजकीयसामाजिकजातीय कार्यक्रम,आंदोलने व निदर्शने आदी कार्यक्रमामुळे तसेच सण व उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात  दि. 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 च्या रात्री 12  वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम1951 चे कलम 37 (1) व (3) लागू करण्यात येत आहेअसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी सी यांनी निर्गमित केले आहे.

या कालावधीत कायदा  व  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने  विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. तरीसदर कालावधीत कोणतीही व्यक्ती शस्त्रसोटेतलवारीभालेदंडेबंदुकासुरेकाठ्यालाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणेकोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणेदगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणेजमा करणे किंवा तयार करणेव्यक्तीच्या आकृत्याप्रतिमा यांचे प्रदर्शन करणेजाहीरपणे घोषणा करणेगाणी म्हणणेवाद्य वाजविणेतसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणेहावभाव करणेचित्रेचिन्हेफलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणेत्यांचे प्रदर्शन करणेत्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात येत आहे.

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही सभामोर्चाउत्सव व मिरवणुका काढू नये. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणीरस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. याची नोंद घ्यावी. सदर आदेश दि. 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 चे रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहीलअसे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी  विनय गौडा जी. सी. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

०००००००

No comments:

Post a Comment