Search This Blog

Sunday 9 April 2023

महाखनिज प्रणालीवर तपासणी अंती रेती वाहतूक करणारे दोन हायवा अवैध गौण खनिज पथकाने केली जप्तीची कार्यवाही

 


महाखनिज प्रणालीवर तपासणी अंती रेती वाहतूक करणारे दोन हायवा अवैध

गौण खनिज पथकाने केली जप्तीची कार्यवाही

चंद्रपूरदि.09: गौण खनिज पथकाने दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना एमएच 34 बीजी 8386 क्रमांकाचा हायवाची महाखनिज प्रणालीवर तपासणी केली असता जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी चार तासापेक्षा जास्त अवधी घेतलात्यामुळे सदर प्रणालीवर अवैध दाखविले. म्हणून सदर हायवा जप्त करण्यात आला. सदर वाहन हे नूर मोहम्मद नावाच्या व्यक्तीच्या मालकीचे आहे.

तसेच काही वेळानंतर एमएच 34 बीझेड 4996 हायवा तपासला असता तो सुद्धा महा खनिज प्रणालीने अवैध दाखविल्यामुळे जप्त करण्यात आला. सदर हायवा आमीर खान या व्यक्तीच्या मालकीचा आहे.

सदर कारवाई करताना फ्लाईंग स्क्वाॅडमध्ये नायब तहसीलदार अविनाश शेंबटवाडतलाठी सुरज राठोडपोलीस पाटील जानकीराम झाडेसाईनाथ धुडसेपोलीस कर्मचारी प्रशांत नैतामकोतवाल अंबादास गेडाम व वाहन चालक राहुल भोयर कार्यरत होते.

0000000

No comments:

Post a Comment