Search This Blog

Thursday 14 March 2024

जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द

जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द

चंद्रपूरदि. 14 :  सावकारी परवान्याचे नुतनीकरण न केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तिंना सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यात चंद्रपूर तालुक्यातील 11 व्यक्तीराजुरा तालुक्यातील 6ब्रम्हपूरी तालुक्यातील 2 तसेच भद्रावतीनागभीडसिंदेवाही आणि चिमूर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तिचा समावेश आहे.

महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अन्वये सावकारी परवाना नुतनीकरण 31 मार्च 2023 पूर्वी करणे बंधनकारक असते. त्यानंतर दोन महिन्यांच्या मुदतीत म्हणजे 31 मे 2023 पर्यंत अतिरिक्त शुल्क 500 रुपये भरून नुतनीकरण करता येते. मात्र त्यानंतर आलेल्या अर्जावर संबंधित सावकाराचे सहायक निबंधक,  सहकारी संस्था हे अर्ज स्वीकारू शकत नाही. त्यामुळे सावकारी परवानाशिवाय संबंधित व्यक्तिंना सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध केला जातो. सध्या जिल्हा उपनिबंधकसहकारी संस्था कार्यालयाच्यावतीने सावकारी परवाना रद्द करण्याची प्रकिया सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात असे एकूण 23 व्यक्ती असून त्यांचा परवाना रद्द करण्यात आल्याचे सावकाराचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.

सावकारी परवाना रद्द झालेल्या व्यक्ती : चंद्रपूर तालुक्यातील विलास पांडूरंग निखारे (गजानन महाराज मंदीर रोडस्नेहनगरचंद्रपूर)विनोद नारायण अलगेरवार (हनुमान मंदिराजवळ भिवापूर रोडचंद्रपूर)ओम हायर परचेस प्रोप्राशंकर वासुदेव शेंडे आणि कवलजितसिंग इंद्रजितसिंग सलूजा (चंद्रपूर)अशोक राजम येरकल (लालपेठ कॉलरी नं. 1नांदगाव रोडचंद्रपूर)बलविरसिंग हरभजनसिंग चड्डा (दीक्षित ले-आऊटबापटनगरचंद्रपूर)प्रकाश सिताराम गुंटेवार (सिव्हील लाईनवॉर्ड क्र. 1चंद्रपूर)सरीता राजेंद्र मालू (सिव्हील लाईनचंद्रपूर)ईझी फायनान्स प्रोप्रा. शुभम मारोती खुसपरे (गजानन मंदीर वॉर्डचंद्रपूर)रामदेवबाबा फायनान्स प्रोप्रा. प्रशांत भास्करराव कोलप्याकवार (रेल्वे स्टेशन रोडचंद्रपूर) क्रिष्णा राज क्रिष्णन पी. क्रिष्णा स्वामी रेड्डी (तुकूमचंद्रपूर) आणि निलेश मधूकर नावकर (बगड खिडकीचंद्रपूर)

राजुरा तालुक्यातील अनिल रामभाऊ गंप्पावार (रामनगर कॉलनीराजूरा)राजेश बंडू यशुरवार (गडी वॉर्ड क्र. 1राजुरा)नवनीत चंद्रकांत घट्टवार (राणा वॉर्ड क्र. 5 राजुरा)अवेज शकील अन्सारी (मौलाना आझादराजुरा)संदीप घनश्याम पडवेकर (रमाबाई वॉर्डराजुरा) आणि अंकूश अरविंद्र गंप्पावार (इंदिरा नगरराजुरा). ब्रम्हपूरी तालुक्यातील राजेंद्र श्यामसुंदर काळबांधे (मु.पो. हळदाता. ब्रम्हपुरी) आणि हनुमंतराव मोनाजी राऊत (हळदाता. ब्रम्हपुरी). याशिवाय मार्गवी आनंद नायर (न्यू समठानाभद्रावती)हमीद युसूफ शेख (मु.पो. तळोधीता. नागभीड)मंदा बबनराव येमुलवार (मु.पो. सिंदेवाही) आणि जयलक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा सौरभ सुभाष येल्लेवार (मु.पो. भिसीता. चिमूर).

०००००००

No comments:

Post a Comment