Search This Blog

Saturday, 23 March 2024

आयटीआय मधील निरुपयोगी साहित्याचा 3 एप्रिल रोजी लिलाव

 आयटीआय मधील निरुपयोगी साहित्याचा 3 एप्रिल रोजी लिलाव

चंद्रपूर दि. 23 : नागभीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथे व्यवसायातील निरुपयोगी कालबाहय झालेली निर्लेखित संयत्रे साहित्य उपकरणे असून आहे त्याच अवस्थेत विक्री करण्यात येत आहे. या करिता 3 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

            इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थाएम. आय. डी. सी. परिसरनागभिड येथे अधिकृत लेख्यासह उपस्थित राहावे, असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.एम.डांगे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment