Search This Blog

Tuesday 5 March 2024

वनांची सेवा आणि पर्यावरणाचे संरक्षण हे ईश्वरीय कार्य - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार





वनांची सेवा आणि पर्यावरणाचे संरक्षण हे ईश्वरीय कार्य -  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø वन भवनाच्या इमारतीचे भुमिपूजन

चंद्रपूरदि. 5 : जंगल से जीवन के मंगल तक’ आणि वन से धन तक’ या संकल्पनेवरच वन विभाग काम करीत आहे. वनांची सेवा आणि पर्यावरणाचे संरक्षण हे ईश्वरीय कार्य आहे. त्यामुळे या भवनातून वन संवर्धन आणि वनांची सुरक्षेचे काम होईलअसा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

नवीन वनभवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वासमहिम गुप्ता (वन्यजीव)ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकरउपवनरंक्षक कुशाग्र पाठकजितेश मल्होत्रासार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणेकार्यकारी अभियंता मुकेश टांगलेविभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर – नागपूर रस्त्यावर जवळपास 8153 चौ. मी. वर नवीन वनभवन उभे राहत आहेअसे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेयेथे कार्यरत असलेले सात विविध कार्यालये एकाच छताखाली आता येणार आहे. वन संवर्धन आणि वनांची सुरक्षा या भवनातून होईल. राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेले चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे प्रगतीच्या विविध क्षेत्रात अधोरेखांकित झाले आहेत. आपल्या राज्याचा वनविभाग हा उत्तम व्हावायासाठी आपण सर्वजण संकल्प करू याअसे आवाहन त्यांनी केले.   

वनविभागाचा सुवर्णकाळ :  सध्या वनविभागाचा सुवर्णकाळ सुरू आहे. इतर विभागांनी हेवा करावाअसे काम वनविभागात होत आहे. यासाठी वरिष्ठ अधिका-यांसह गावस्तरावर काम करणारे अधिकारी आणि कर्मचा-यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी हे अतिशय बुध्दीमान आणि संयमी अधिकारी आहेत. तर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर आणि महिप गुप्ता हे कल्पक अधिकारी आहेतअसे गौरवोद्गार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

असे राहील नवीन वनभवन : चंद्रपूर – नागपूर रस्त्यावर सिव्हील लाईन येथे 60 कोटी 92 लक्ष रुपये खर्च करून नवीन वनभवन साकारण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर (2229.74 चौ.मी.) मुख्य वनसंरक्षक कार्यालयपहिल्या माळ्यावर (1507.82 चौ.मी.) उपवनसंरक्षकमध्यचांदा विभाग कार्यालयदुस-या माळ्यावर (1497.05 चौ.मी.)  विभागीय वन अधिकारीचंद्रपूर वनविभाग कार्यालयतिस-या माळ्यावर (1497.05 चौ.मी.) विभागीय वन अधिकारीचवथ्या माळ्यावर (1421.63 चौ.मी.) विभागीय वन अधिकारीमुल्यमापन विभाग आणि संशोधन विभाग राहणार आहे. याशिवाय वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक कक्षसंरक्षण भिंतीचे बांधकामसिमेंट काँक्रिट अंतर्गत रस्ते बांधकामसिमेंट नाली बांधकामवाहनतळवाहनशेडपेव्हींग ब्लॉकफर्निचररेनवॉटर हार्वेस्टिंगजलपुनर्भरण व पाणी साठवण टाकीबागबगीचा व लॅन्डस्केपम्युलरपेंटींग व स्क्लप्चरपाणी पुरवठा व मलनि:सारण आदी कामे करण्यात येणार आहे.

०००००००

No comments:

Post a Comment