Search This Blog

Friday 15 March 2024

21 मार्च रोजीचा वरोरा येथील लायसन्स कॅम्प रद्द

 21 मार्च रोजीचा वरोरा येथील लायसन्स कॅम्प रद्द

चंद्रपूरदि. 15 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंट नुसार देण्यात येतात. त्यानुसार वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात 21 मार्च 2024 रोजी लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात आला होता. मात्र शासकीय विश्रामगृह उपलब्ध न झाल्याने वरोरा येथे 21 मार्च रोजी होणारा लायसन्स कॅम्प रद्द करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment