Search This Blog

Tuesday 19 March 2024

स्थायी निगराणी पथक व फिरत्या पथकाच्या प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिका-यांचे अधिकार

 

स्थायी निगराणी पथक व फिरत्या पथकाच्या प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिका-यांचे अधिकार

चंद्रपूर दि. 19 : आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यात तसेच 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी स्थायी निगराणी पथक (एस.एस.टी.) व फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड) यांच्या प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिका-यांचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) चे कलम 21 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले स्थायी निगराणी पथक (स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम) आणि फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड) यांच्या प्रमुखांना निवडणूक प्रक्रिया कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 129, 133, 143 आणि 144 अन्वये अधिकारी प्रदान करण्यात आले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 62 स्थायी निगराणी पथक (राजूरा – 15, चंद्रपूर – 4, बल्लारपूर – 6, वरोरा – 12, वणी – 13 आणि आर्णी 12) तर 42 फिरते पथक (राजूरा – 12, चंद्रपूर – 4, बल्लारपूर – 8, वरोरा – 4, वणी – 4 आणि आर्णी 10) स्थापन करण्यात आले आहेत. तसेच गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात 8 स्थायी निगराणी पथक आणि 5 फिरते पथक तर चिमूर विधानसभा मतदार संघात 4 स्थायी निगराणी पथक आणि 4 फिरते पथक स्थापन केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment