Search This Blog

Thursday 14 March 2024

वंचितांच्या विकासासाठी प्रधानमंत्री सुरज पोर्टल महत्त्वाचे : हंसराज अहिर





 

वंचितांच्या विकासासाठी प्रधानमंत्री सुरज पोर्टल महत्त्वाचे : हंसराज अहिर

चंद्रपूर, दि. 14 मार्च : समाजातील वंचित लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी गाव पातळीवरील शासकीय यंत्रणेसह डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा आर्थिक मोलाचा ठरला आहे. केंद्र शासनाने त्या दृष्टीने अधिक सुलभतेसाठी प्रधानमंत्री सामाजिक उत्थान रोजगार आधारित जनकल्याण ॲपचे लोकार्पण केले असून हे ॲप अधिक मोलाचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी 'प्रधानमंत्री सुरज' या राष्ट्रीय पोर्टलचे दूरदृष्यप्रणाली द्वारे लोकार्पण करण्यात आले. यानिमित्त वन अकादमी चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर सामाजिक न्याय व अधिकारी का मंत्रालय नवी दिल्लीचे अवर सचिव राकेश कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मुकेश बारमासे उपस्थित होते.

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय अंतर्गत भारतातील प्रमुख शहरात दूरदृष्यप्रणाली द्वारे देशव्यापी शासकीय योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी वन अकादमी येथे विविध लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात आयुष्यमान कार्डचे वाटप तसेच अपंग व्यक्तींना विवाह आर्थिक सहाय्य म्हणून प्राथमिक स्वरूपात नऊ जणांना २५ हजार रुपये प्रमाणे धनादेश वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी तर आभार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment