Search This Blog

Thursday, 14 March 2024

वन शेताशी निगडीत वृक्ष उत्पादकांचा मेळावा

 वन शेताशी निगडीत वृक्ष उत्पादकांचा मेळावा

चंद्रपूरदि. 14 :  वन शेतीशी निगडीत असलेल्या शेतक-यांसाठी वन अकादमीचंद्रपूर येथे वृक्ष उत्पादकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विदर्भातील  चंद्रपूरगडचिरोलीनागपूरवर्धाभंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकरी तसेच पेपरयांत्रिकी व बांबू निगडीत बल्लारपूर पेपर मीलशिरपूर पेपर मीलबांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रवनशेतीशी निगडीत रोपवाटिका यांचा समावेश होता.

यावेळी पुणे येथील सामाजिक वनीकरण विभागाचे अपर मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकरवन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डीनागपूर येथील सामाजिक वनीकरण संरक्षक किशोर मानकरताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकरनागपूर वनवृत्तातील सर्व विभागीय वन अधिकारी उपस्थित होते.

उद्योगांनी वनशेती व त्यातील आर्थिक ताळमेळ याबाबत माहिती दिली. तसेच वनशेती कशी फायदेशीर आहेयाबाबत मार्गदर्शन केले. यानंतर बल्लारपूरच्या नर्सरीला भेट देऊन शेतक-यांना निलगीरी रोपे व त्याच्या संवर्धनाची माहिती देण्यात आली. यावेळी विभागीय वन अधिकारी बी.सी.येळेवनपरिक्षेत्र अधिकारी श्री. इंगळेश्री. राजुरकर आदी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment