Search This Blog

Wednesday, 25 November 2026

दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी बिज भांडवल योजना

 दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी बिज भांडवल योजना

चंद्रपूर, दि.25 : दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी बिज भांडवल उपलब्ध करून देणे, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 1 लक्ष रुपये एवढी करण्यात येऊन प्रकल्प खर्चाची मर्यादा दीड लक्ष रुपये एवढी करण्यास व प्रकल्प खर्चाच्या जास्तीत जास्त 20 टक्के एवढी रक्कम अनुदान व उर्वरित 80 टक्के रक्कम बँकेकडून कर्ज रुपात देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

अटी व शर्ती : सदर योजनेसाठी अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे आहे,  योजनेसाठी शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षणाची अट नाही, अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिकृत रहिवाशी असला पाहिजे, बौध्दिक अक्षम, सेरेबल पाल्सी, ऑटिझम, बहुविकलांग दिव्यांग प्रवर्गातील अर्जदारांना पालकत्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे अत्यावश्यक : 1) प्रस्ताव विहीत नमुना फॉर्म मध्ये दोन प्रतीत सादर करणे आवश्यक. 2) अलीकडील दोन पासपोर्ट फोटो. 3) तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला. (फक्त कर्ज प्रकरणासाठीचा)  4) जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील त्रिसदस्यीय समितीचे वैद्यकिय प्रमाणपत्र. 5) जन्मतारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला. 6) अधिवास प्रमाणपत्र. (डोमेशियल) 7) रेशनकार्डची झेरॉक्स.

8) आधारकार्ड झेरॉक्स. 9) बँक पासबुक. 10) ज्या व्यवसायासाठी प्रस्ताव सादर करावयाचा आहे. नोंदणी प्रमाणपत्र / दरपत्रक (कोटेशन)/ प्रकल्प अहवाल सादर करावा. 11) उदयम प्रमाणपत्र. 12) बेरोजगार दाखला.

उपरोक्त सर्व कागदपत्रांच्या प्रती स्वाक्षांकित करुन परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयास सादर करावा.

सदर योजनेचा जिल्ह्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment