Search This Blog

Saturday, 10 February 2018

दुग्ध उत्पादनात धवलक्रांती घडविण्याची चंद्रपूरला उत्तम संधी- ना.हंसराज अहीर


मन झोकून काम करण्याचे अधिका-यांना आवाहन

            चंदंद्रपूर, दि.10 फेब्रुवारी- केंद्र व राज्यातील सहभागी असणा-या सर्व सत्ताधा-यांना विदर्भामध्ये शेतक-याच्या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारीत उद्योग वाढावे, असे वाटते. त्यामुळेच मदरडेअरी सारखी यंत्रणा चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून दुग्ध उत्पादनात क्रांती करण्याची ही एकमेव संधी समजून झोकून देत अधिका-यांनी काम करावे, असे आवाहन केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले. शासकीय विश्रामगृहामध्ये आज आयोजित मदर डेअरीचे अधिकारी, दुध संकलन केंद्र संचालक यांच्या बैठकीत त्यांनी जिल्हयात सुरु असलेल्या मदर डेअरीच्या उपक्रमाचा आढावा घेतला. सद्या 15 हजार लिटर दुध संकलनाचे काम जिल्हयात सुरु असून यामध्ये उतरोत्तर वाढ करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
            यावेळी त्यांनी मदर डेअरी व दुध उत्पादक संकलन केंद्राच्या संचालकांच्या समस्या जाणून घेतल्या. खाजगीरित्या गायी खरेदी करण्यासाठी अनेक कुटूंबांना प्रोत्साहीत करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. यासाठी इन्सुरन्स कंपनीनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.  उत्तम प्रतीच्या दुधाळू जनावरांची उपलब्धता जिल्हयात होईल, यासाठी पशुसंवर्धन विभागाने लक्ष वेधावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हयामध्ये दुधाळू जनावरांच्या संदर्भातील शासकीय योजना लोकापर्यंत पोहचतील पशुधन मोठया प्रमाणात विविध शासकीय योजनेमधून उपलब्ध होईल. यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले. दुधात फॅट कमी असण्याबाबत यावेळी चर्चा उपस्थित झाली. यावेळी अहीर यांनी पशुवैद्यकीय अधिका-यांनी उपलब्ध पशुधनाच्या आरोग्य व दुध वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच उत्तम दर्जाचा चारा उत्पादनाबाबत शेतक-यांना गती दयायला सांगण्याचे स्पष्ट केले.
            जिल्हयामध्ये दुग्ध व्यवसाय करण्यास इच्छूक असणा-या शेतकरी कुटूंबांना मुद्रा योजनेमधून कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिका-यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या मुद्रा योजनामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून चंद्रपूर जिल्हयामध्ये सर्वाधिक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या विक्रमाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व बँकांनी याबाबतीत कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच ज्या ठिकाणी महिलांकडून कर्जाची मागणी झाली. त्या ठिकाणी प्राधान्याने त्यांना कर्ज उपलब्ध करुन दयावे. दुध उत्पादनातील बँकांच्या कर्जाला निश्चितच परतफेड मोठया प्रमाणात मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.  
            यावेळी त्यांनी मदर डेअरीमुळे दुध उत्पादनात वाढ झाल्याबद्दल कौतुकही केले.
            यावेळी महानगरपालिकेचे उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा परिषद सभापती अर्चना जिवतोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक झा, नाबार्डचे टाले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी देशपांडे, विजय राऊत, राजू घरोटे, पाटील उपस्थित होते.       
                                                             0000

Thursday, 8 February 2018

ना.सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा कार्यक्रम


 चंद्रपूर, दि.8 फेब्रुवारी- राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हे 10 व 11 फेब्रुवारी  2018 रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
            10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.45 वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन चंद्रपूर येथे दुपारी 12.15 वाजता आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता आगरझरी येथील बटरफ्लाय उद्यान उदघाटन समारंभास उपस्थिती. त्यानंतर सायं.5.30 वाजता भारतरत्न डॉ.एपीचे अब्दुल कलाम उद्यान चंद्रपूर येथे चंद्रपूर शहर अंतर्गत रस्त्यांवरील स्ट्रीट लाईटचे लोकार्पण.  सायं.7.30 वाजता घुग्गुस येथे पालकमंत्री चषक कार्यक्रमास उपस्थित राहून चंद्रपूर येथे मुक्काम राहणार आहे.
            तर 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता इंदिरा नगर येथे संकल्प संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनाल चंद्रपूर येथे रामदेव बाबा यांच्या कार्यक्रमाबाबत कोअर टिमच्या बैठकीस उपस्थित. त्यानंतर दुपारी 3 ते 5 या वेळात श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनाल चंद्रपूर येथे रामदेव बाबा यांच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेबाबत बैठकीस उपस्थित राहून सायं.5.30 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
                                                                        000

Friday, 26 January 2018

चंद्रपूरातील अत्‍याधुनिक बसस्‍थानक 18 महिन्‍यात जनतेच्‍या सेवेत रूजु होणार – ना. सुधीर मुनगंटीवार






16 कोटी रू. किंमतीचे बसस्‍थानकाच्‍या कामाचा भुमीपूजन सोहळा संपन्‍न

चंद्रपूर, दि.26 जानेवारी- सन 2015 चा अर्थसंकल्‍प सादर करताना एसटी बसस्‍थानकांचा चेहरामोहरा बदलण्‍याची घोषणा अर्थमंत्री म्‍हणून मी केली होती. या घोषणेला अनुसरून चंद्रपूरातील मुख्‍य बसस्‍थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरणासाठी 16 कोटी रू. निधी मंजूर केला. आज या कामाचे भूमीपूजन पाच सेवानिवृत्‍त कर्मचा-यांच्‍या शुभहस्‍ते करताना मला मनापासुन आनंद होत आहे. बल्‍लारपूर आणि मुल या ठिकाणच्‍या बसस्‍थानकांचे आधुनिकीकरण व नुतनीकरणाचे काम सुध्‍दा सुरू करण्‍यात आले आहे. यापुढील काळात पोंभुर्णानागभीडचिमूरगोंडपिपरीकोरपनाघुग्‍गुस सर्वच ठिकाणची बसस्‍थानके देखणी होतील. बसेसच्‍या खरेदीसाठी विशेष निधी आपण उपलब्‍ध केला आहे. नव्‍या बसेस मधील 10 टक्‍के नव्‍या बसेस चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्‍हयांमध्‍ये देण्‍याबाबत आपण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सांगीतले आहे. चंद्रपूरातील बसस्‍थानक आधुनिक स्‍वरूपात 18 महिन्‍यांच्‍या कालावधीत नागरिकांच्‍या सेवेत रूजु होईलअसे प्रतिपादन राज्‍याचे वित्‍तनियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 26 जानेवारी रोजी चंद्रपूर येथील मुख्‍य बस स्‍थानकाच्‍या आधुनिकीकरण व नुतनीकरणाच्‍या कामाचे भुमीपूजन पाच सेवानिव़त्‍त एसटी कर्मचा-यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री ना. हंसराज अहीरआमदार नानाजी शामकुळेवनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेलजिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेमहापौर सौ. अंजली घोटेकरबल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मामनपाचे स्‍थायी समितीचे सभापती राहूल पावडेएसटीचे विभाग नियंत्रक कार्तीक सहारेविभागीय अभियंता राहूल मोडकवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणालेहजारों, लाखो शहीदांच्‍या बलिदानानंतर स्‍वातंत्र्याचा मंगलकलश आपल्‍या हाती आला. हा मंगलकलश चिरंतन काळ अबाधित ठेवण्‍याची जबाबदारी भारतीय नागरीक म्‍हणून आपली आहे. नुकत्‍याच झालेल्‍या कृषी महोत्‍सवात आपण वनावर आधारित कौशल्‍य विकास केंद्र जिल्‍हयात आणण्‍याची घोषणा मी केली होती. यासंदर्भात मी नुकतीच केंद्रीय कौशल्‍य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. आपले सादरीकरण पाहुन त्‍यांनी कौशल्‍य विकास केंद्रासाठी 70 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. टाटा ट्रस्‍ट सोबत झालेल्‍या करारानुसार 90 कोटी रू. किंमतीचे कॅन्‍सर हॉस्‍पीटल जिल्‍हयात आपण उभारत आहोत. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयबॉटनिकल गार्डनसैनिकी शाळापोलिस प्रशिक्षण केंद्र अशी विकासकामांची मोठी मालिका आपण तयार केली आहे. 200 एकर जागेत गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र उभे राहत आहे. बल्‍लारपूरमुल येथे स्‍टेडियमची बांधकामे सुरू होत आहेत. चंद्रपूरात पाच मोकळया जागांचा विकास करून त्‍यासाठी उद्याने निर्माण करण्‍यात आली आहे. पोंभुर्णा येथे भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या नावाने इको पार्क निर्माण करण्‍यात आले आहे. विकास प्रक्रिया सर्वसमावेशक असावी यावर आपला नेहमीच भर राहिला आहेअसेही ना. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

सबका साथ सबका विकास या ब्रीदानुसार पालकमंत्र्यांचे कार्य
– ना. हंसराज अहीर
उत्‍तम रस्‍तेस्‍टेडियमपिण्‍याचे पाणीबसस्‍थानकेपुलइमारती अशा विविध पायाभूत सुविधांना अग्रक्रम देत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्‍हयाच्‍या विकासाला गती देत आहेत. मा. पंतप्रधानांच्‍या सबका साथ सबका विकास या ब्रीदानुसार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या जिल्‍हयाला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करीत आहे. गेल्‍या तीन दिवसांपासुन विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पणाचा धडाका त्‍यांनी सुरू केला आहे. येत्‍या काळात या जिल्‍हयाचा चेहरामोहरा बदलेल व हा जिल्‍हा राज्‍यातला प्रमुख विकसित जिल्‍हा म्‍हणून नावारूपास येईलअसे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ना.  सुधीर मुनगंटीवार हे खरे विकासपुरूष – आमदार नानाजी शामकुळे

चांदा ते बांदा ही संकल्‍पना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली व त्‍याला अनुसरून चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासाला वेग दिला. वनविभागाला नवी ओळख त्‍यांनी मिळवून दिली. कधीकाळी 25 कोटी रूपये या जिल्‍हयाच्‍या विकासासाठी मिळणे कठीण जात होते. त्‍या जिल्‍हयात आज 600 कोटी रू. किंमतीचे मेडीकल कॉलेज उभे राहते65 कोटी रू. किंमतीचा दाताळा येथील पुलाचे बांधकाम मंजूर होते16 कोटी रू. किंमतीचे बसस्‍थानकाचे बांधकाम मंजूर होते. ना. सुधीर मुनगंटीवार हे ख-या अर्थाने विकासपुरूष असल्‍याचे प्रतिपादन आ. शामकुळे यांनी यावेळी बोलताना केले.

जिल्‍हा विकासाच्‍या वाटेवर अग्रेसर – देवराव भोंगळे

गेल्‍या तीन दिवसांपासुन कोटयावधींच्‍या विकासकामांची भुमीपूजने व शुभारंभाचे कार्यक्रम सुरू आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये चंद्रपूर हा जिल्‍हा विकासाचे आदर्श उदाहरण म्‍हणून पुढे येत आहे. आरोग्‍यशिक्षणपर्यावरणपिण्‍याचे शुध्‍द पाणीरोजगार या सर्व बाबींना प्राधान्‍य देत पुढील 50 वर्षांचा दृष्‍टीकोन ना.  सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे ठेवून या जिल्‍हयाला विकासाच्‍या वाटेवर पुढे आणले आहेअसे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
यावेळी स्‍वातंत्र्य संग्राम सैनिक शंकरलाल लांजेवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला. ज्‍यांनी या बसस्‍थानकाचे संकल्‍पचित्र तयार केले आहे ते आर्कीटेक्‍ट  किशोर चिददरवार यांचेही स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग नियंत्रक कार्तीक सहारे यांनी केले. आभार प्रदर्शन विभागीय अभियंता राहूल मोडकवार यांनी तर संचालन शीतल गौड यांनी केले. निवृत्‍त एसटी कर्मचा-यांचे स्‍वागत या कार्यक्रमादरम्‍यान करण्‍यात आले. एसटी कर्मचारी संघटनाबसस्‍टॅन्‍ड कर्मचारी संघटनाऑटोरिक्षा संघटनाग्रामीण पत्रकार संघ आदी संघटनांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार केला. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
                                                            000

पोलिस कल्‍याणासाठी शासन पोलिसांच्‍या भक्‍कमपणे पाठिशी – ना. सुधीर मुनगंटीवार



चंद्रपूरात अत्‍याधुनिक पोलिस व्यायाम शाळेचे लोकार्पण

चंद्रपूर, दि.26 जानेवारी- सुदृढ शरीरात उत्‍तम मन वास करते. पोलिसांना उत्‍तमनिरामय आरोग्‍य आवश्‍यक आहे. समाजात मनभेद निर्माण करणा-यांना वठणीवर आण्‍ण्‍याचे काम पोलिस कर्मचारी करतात. पोलिस कल्‍याणशी संबंधित नस्‍ती कधी आली व ती निगेटीव्‍ह असली तर ती मी पॉझीटीव्‍ह करतो. सायबर क्राईम लॅब प्रथमतः चंद्रपूरात सुरू झाली. 2015 मध्‍ये ही सुरूवात करणारा चंद्रपूर हा पहिला जिल्‍हा ठरला. त्‍यानंतर इतर जिल्‍हयांमध्ये सायबर क्राईम लॅब सुरू झाल्‍या. पोलिस भरतीमध्‍ये जिल्‍हयाचे प्रमाण अधिक वाढावे यासाठी पोलिस प्रशिक्षण केंद्र,पोलिसांसाठी निवासस्‍थाने आम्‍ही तयार करीत आहोत. निवृत्‍त पोलिस कर्मचा-यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्‍या माध्‍यमातून घरे देण्‍याचा आमचा मानस असल्‍याचे प्रतिपादन राज्‍याचे वित्‍तनियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोलिस कल्‍याणासाठी शासन पोलिसांच्‍या पाठिशी भक्‍कमपणे उभे असल्‍याचे त्‍यांनी यावेळी बोलताना स्‍पष्‍ट केले.
दिनांक 26 जानेवारी रोजी चंद्रपूरात पोलिस जीम च्‍या लोकार्पण सोहळयात ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आ.नानाजी शामकुळेजिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेमहापौर सौ.अंजली घोटेकरउपमहापौर अनिल फुलझेलेपोलिस अधिक्षक नियती ठाकर,अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणालेपोलिस दल अधिक सक्षम करण्‍याच्‍या दृष्‍टीने आम्‍ही जिल्‍हयात 102 कोटी रूपये खर्च करून पोलिसांसाठी क्‍वॉर्टरचे बांधकाम केले. बल्‍लारपूर येथे 10 कोटी रू. निधी खर्चून नव्‍या पोलिस स्‍टेशनचे बांधकामदुर्गापूर येथे नविन पोलिस स्‍टेशनचे बांधकाम आपण करीत आहोत. राज्‍यात काहीच ठिकाणी असणारी अशी सीसीटिव्‍ही मोबाईल व्‍हॅन चंद्रपूरात आपण घेतली. पोलीसांना सुविधा देण्याबाबत हात आखडता घेणार नाही. जिल्हा दारुबंदी करतांना जिल्हयाच्या सदृढ आरोग्याचाच आम्ही विचार केला होता. पोलिसांनी या घोषणेला उत्तम प्रतिसाद दिला असून जिल्‍हा व्‍यसनमुक्‍त करण्‍याच्‍या प्रक्रियेमध्‍ये योगदान देण्‍याचे आवाहन ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
1.36 कोटी रू. खर्चून बांधण्‍यात आलेल्‍या या पोलिस जीम चे लोकार्पण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पोलिस अधिक्षक नियती ठाकर यांनी केले. या पोलिस जीमच्‍या माध्‍यमातून पोलिसांच्‍या आरोग्‍याला आकार देण्‍याचे काम होणार असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. पुण्‍यामध्‍ये असणा-या व्‍यायामाच्‍या मशीन्‍स याठिकाणी आहेत. सरकारी यंत्रणेतील ही पहिली अदयावत यंत्रणा आहे. यातील काही आधुनिक यंत्रे चेन्‍नईहुन मागविण्‍यात आली आहेत. पोलिसांच्‍या आरोग्‍यवर्धनाच्‍या दृष्‍टीने ही व्‍यायामशाळा अतिशय महत्‍वाची ठरणार असल्‍याचे नियती ठाकर म्‍हणाल्‍या. अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक हेमराज राजपुत यांनीही यावेळी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्‍हयातील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 
                                                            00000

विकास प्रक्रियेत माझाही महत्‍वपूर्ण सहभाग राहील हा संकल्‍प प्रत्‍येक नागरिकाने करावा – ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन





 चंद्रपूरमध्ये प्रजासत्ताक दिनाला उल्लेखनीय कार्य करणा-यांचा सत्कार

चंद्रपूर, दि.26 जानेवारी- चंद्रपूर जिल्‍हा विकासाचे विविध टप्‍पे अनुभवत आहे. या जिल्‍हयाला विकासाच्‍या वाटेवर अग्रेसर करताना विकास प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रजासत्‍ताक दिनी सिमेवर लढताना प्राणांची आहूती देणा-या वीरांचे स्‍मरण करताना आपण धर्मभेदजातीभेद न करता देशाप्रती आपले दायित्‍व पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रजासत्‍तादिनी जिल्‍हयाच्‍या विकासाला गती देण्‍याचा संकल्‍प करताना विकास प्रक्रियेत माझाही महत्‍वपूर्ण सहभाग राहील हा संकल्‍प प्रत्‍येक नागरिकाने करण्‍याचे आवाहन राज्‍याचे वित्‍तनियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 26 जानेवारी प्रजासत्‍ताक दिनी चंद्रपूर येथे शासकीय ध्‍वजवंदन कार्यक्रमात ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी गृह, कृषी, क्रीडा, शिक्षण आदी विभागात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री शांतारामजी पोटदुखेआ.नानाजी शामकुळे, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेमहापौर सौ. अंजली घोटेकरमनपाचे स्‍थायी समिती सभापती राहूल पावडेउपमहापौर अनिल फुलझेलेजि.प. उपाध्‍यक्ष कृष्‍णा सहारेअतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रेपोलिस अधिक्षक नियती ठाकरजिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकार जितेंद्र पापळकर, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, स्वातंत्र्य सैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणालेचंद्रपूर जिल्हा महाराष्‍ट्रात विकास प्रक्रियेत अग्रणी जिल्हा म्‍हणून लौकीक प्राप्‍त ठरण्‍याच्‍या दृष्‍टीने वाटचाल करीत आहे. मोठया प्रमाणावर विकासकामे जिल्‍हयात सुरू आहे. चंद्रपूर,बल्‍लारपूरमुल येथील बसस्‍थानकांचे आधुनिकीकरण व नुतनीकरणचंद्रपूर शहरात अमृत पाणीपुरवठा योजनाटाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने कॅन्‍सर हॉस्‍पीटलजल साक्षरता केंद्रदुग्‍धव्‍यवसाय व कुक्‍कुट पालनाचे प्रकल्‍पचंद्रपूर आणि बल्‍लारपूर येथील हरीत रेल्‍वे स्‍थानके म्‍हणून विकसित करणेशासकीय वैद्यकिय महाविद्यालयसैनिकी शाळाबांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रबॉटनिकल गार्डनताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्‍थळ  करणेचिचडोहचिचाळा,पळसगांव आमडी यासारखे सिंचन प्रकल्‍प असे अनेक विकासकामे व प्रकल्‍प मंजूर झाले असून काही प्रगतीपथावर आहेत. हॅलो चांदा सारखा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेचा अभिनव प्रयोग देशात चंद्रपूरमध्ये सुरु आहे. हा जिल्‍हा राज्‍यासाठी विकासाचे मॉडेल ठरेल याचा मला विश्‍वास आहेअसेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
ध्‍वजवंदन कार्यक्रमानंतर विविध शाळांचे संचालनपथकदंगानियंत्रण पथकॲम्ब्युलन्ससीसीटिव्‍ही व्‍हॅन, मोबाईल फॉरेंसिक लॅब, जिल्‍हा विकास स्‍वच्‍छता मिशन आदीं‍ विषयीचे चित्ररथांना मानवंदना देण्यात आली. यामध्ये सर्वांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले. यावेळी विविध शाळांच्‍या विद्यार्थ्‍यांनी कवायती व प्रात्‍याक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे संचालन अशोक सिंह उपाख्य मोंटू सिंग यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील गणमान्‍य नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 
          यावेळी  चंद्रपूर येथील न्यु.इंग्लिश हायस्कूल, सिटी हायस्कूल, जनता हायस्कूल, नेहरु विद्यालय, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, एफ.ई.एस.गर्ल्स हायस्कूल. छोटूभाई  पटेल हायस्कूल.रफी अहमद किदवाई हायस्कूल. स्व.बापुरावजी वानखेड विद्यालय, सिध्दार्थ विद्यालय,  हिंदी माध्यमिक विद्यालय, मातोश्री विद्यालय, भवानजीभाई चव्हाण हायस्कुल व नुतन माध्यमिक विद्यालय, हिंदी सिटी हायस्कुल, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुला-मुलींनीच्या चमुनी सामुहिक कवायत, लेक्षीम प्रात्यक्षिके व सामूहिक बांबूड्रिल सादर केलीत. तर फेरिलॅड इंग्लिश स्कुल भद्रावतीच्या मुलांनी खडीमास पिटी बँड सादर केली.
          या कार्यक्रमामध्ये पोलिस उपनिरीक्षक विनोद तिवारी (राष्ट्रपती पदक प्राप्त), सतिश सोनेकर (विशेष सेवा पदक प्राप्त), विनित घागे (विशेष सेवा पदक प्राप्त), आणि सीटीएनएस कार्यप्रणातील उत्कृष्ट काम केल्याबद्दल चंद्रकांत लांबट, पोलीस शिपाई गोपाल पिंपळशेंडे, पोलीस क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामासाठी चेतन जाधव, अमृता चक्रे, मिलींद आत्राम, वैशाली पाटील, लतिका मिसार, प्रिती महाजन, दिव्या कलीये यांना पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी गौरवान्वित केले. तर वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार दत्तात्रय गणपतराव गुंडावार मु.चिंचाळा, गुणवंत जिल्हा क्रीडा पुरस्कार चैताली कन्नाके, अनिल ददगाळ, सुरेश अडपेवार यांना पालकमंत्री याच्याहस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. याशिवाय स्वच्छ भारत मिशन वक्तृत्व स्पर्धोसाठी पायल पिलारे, प्रशिक मानके यांना पुरस्कार देण्यात आला. तर माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या विभागीय स्पर्धेतील निवडीसाठी पायल वाळके, पायल मेश्राम, ललिता शिंदे, सोनुताई जाधव, निखिता मेश्राम यांचा गौरव करण्यात आला.
                                                          000