Search This Blog

Monday, 15 July 2019

कौशल्याच्या आधारे जग जिंकता येते : ना. मुनगंटीवार



कौशल्यपूर्ण प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवण्याकरीता युवकांनी
पुढाकार घेण्याचे आवाहन
v कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागामार्फत जागतिक
युवा कौशल्य दिन साजरा
चंद्रपूर. दि, 15 जुलै: अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून युद्धाच्या माध्यमातून जग जिंकता येत नसून या जागतिकीकरणाच्या आधुनिक युगात जगाला कौशल्याच्या आधारे जिंकता येते. त्याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता विविध योजना सुरू केलेल्या आहे. त्याचा लाभ घ्यावा तसेच जिल्ह्यातील युवकांनी उद्योगांमध्ये पुढाकार घेऊन प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवावा, असे राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित युवाशक्तीला आवाहन केले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात 15 जुलै रोजी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक राहुल पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा नियोजन अधिकारी नरेश उगेमुगे, राहुल ठाकरे, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक उद्धव येरमे, उद्योजकता विकास अधिकारी भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते.
15 जुलै रोजी देशात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. चंद्रपूरमध्ये विविध मार्गदर्शक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचे औचित्य साधून बोलतांना ते म्हणाले, या दिनी फक्त कार्यक्रम आयोजित करून जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याचा दिवस नाही. तर देशातील युवकांनी स्वतःमध्ये कौशल्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून संकल्प करण्याचा हा दिवस आहे. भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असा इतिहासात उल्लेख आहे. 1750 मध्ये जगाच्या एकूण उत्पन्नापैकी एकट्या भारत देशाचे उत्पन्न 50 टक्के होते. परंतु आज  गरजेच्या अनेक वस्तू परदेशातून आयात कराव्या लागतात. कारण युवकांना स्वतःचे कौशल्य ओळखता आलं नाही. म्हणून आजही आपला देश निर्मिती व निर्यातीमध्ये मागे आहे. आपल्या युवकांमध्ये शक्ती आहे, परंतु त्या शक्तीला कौशल्याची जोड देण्याची गरज असून त्याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून कौशल्य भारत योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील युवकांनी घ्यावा व कौशल्य निर्माण करून स्वतःसोबतच देशाचाही विकास साधावा. हाच खरा भारत मातेचा जयजयकार असेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
            राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना  युवकांमध्ये कौशल्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून तसेच उद्योजकता निर्माण होण्याकरिता निधीची तरतूद केलेली आहे. पोंभूर्णा येथे अगरबत्ती तसेच टूथपिक निर्मितीचा उद्योग सुरू केलेला असून या माध्यमातून जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. जिल्ह्यात सैनिकी शाळेची निर्मिती करण्यात आलेली असून भविष्यात राष्ट्राचा लष्करप्रमुख या शाळेतून शिकलेला असेल तेव्हा सर्वांची छाती अभिमानाने फुलून येईल. जिल्ह्यात वनसंपत्ती, खनिज संपत्ती व  कृषी संपत्तीची कमतरता नसून त्या आधारित उद्योगांची कमतरता आहे. हे ओळखूनच चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. त्यामुळे बांबूवर आधारित उद्योग करणाऱ्या महिला तसेच युवकांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होणार आहे. उत्पादनाच्या क्लस्टर पद्धतीचा शोध भारत देशामध्येच लागला असून त्याचे महत्त्व तरुणांनी ओळखावे. तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक बाबींसाठी करावा. जग बदलाची तसेच देश बदलाची वाट न पाहता बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी आणि जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित युवकांना दिल्या.
नोव्हेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. आपल्या देशात 2015 पासून हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रशासकीय भवन ते प्रियदर्शनी सभागृहापर्यंत मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. उपरवाही येथिल स्किल अँड इंटरप्रीनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट व ब्रह्मपुरी येथील एकलव्य भटक्या मागासवर्गीय संस्थेमार्फत पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे उपस्थित युवांमध्ये उद्योग संबंधित शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. सोबतच विविध तज्ञांचे मार्गदर्शन  करण्यात आले. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे यांनी कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन केले. नरेश उगेमुगे यांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचा विकास या विषयावर तर राहुल ठाकरे यांनी महाराष्ट्र हिरकणी योजना व कृषीआधारीत उद्योग याचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बल्लारपूर येथील डायमंड कटींग सेन्टरच्या माध्यमातून हि-याला पैलू पाडणाऱ्या कौशल्य विकासाचे प्रात्याक्षिकही युवकांनी अनुभवले. या केंद्राचे संचालक निलेश गुल्हाने यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी कौशल्य विकासामध्ये कार्य करणाऱ्या अग्रणी संस्थांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी तसेच कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी व विद्यार्थी तसेच युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
000000

2020 च्या गणेश स्थापनेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र गॅसयुक्त, धूरमुक्त करण्याचे नियोजन : ना.सुधीर मुनगंटीवार




जिल्ह्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ
v 15 ऑगस्टपर्यंत चंद्रपूर जिल्हा धूरमुक्त व गॅसयुक्त करण्याचा संकल्प
v प्रधानमंत्र्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्ह्यात काम करण्याचे निर्देश
v जनप्रतिनिधी व प्रशासनाने 29 दिवसात उद्यिष्ट्य पर्ण करावे.
चंद्रपूर दि. 15 जुलै : गरीब, वंचित कुटुंबांना 100% एलपीजी गॅस कनेक्शन देणे, शंभर टक्के कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करणे व सर्व पात्र शिधापत्रिकांना शंभर टक्के धान्य वाटप करण्याच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 2020 च्या गणेश स्थापनेपर्यंत संपूर्ण राज्य धूरमुक्त व गॅस युक्त करण्याचे शासन नियोजन करीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी केली.
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तीनही घटकांमधील लाभार्थ्यांना यावेळी पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते एलपीजी कनेक्शन, शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याचे पशुसंवर्धन  दुग्धविकास, मत्स्यविकास विभागाचे प्रधान सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, अर्चनाताई जिवतोडे, वरोराचे नगराध्यक्ष ऐतशाम अली, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेंद्र दांडेकर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
40 लाख कुटुंबांना गॅस देणार
यावेळी संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आधुनिक काळामध्ये आजही आपल्या गावातील आई-बहिणींना आरोग्याला विघातक असणाऱ्या धुरापासून अनेक भागात संरक्षण नाही. आजही लाकूडफाटा जमा करून चुलीवर स्वयंपाक केला जातो. महाराष्ट्रामध्ये सध्या 40 लाख कुटुंबाकडे गॅस कनेक्शन नाही. त्या सर्व कुटुंबांना गॅस युक्त करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाचा असून त्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग कार्यरत झाला आहे. आता शासन अतिशय सकारात्मक असतांना  यासंदर्भातील उद्दिष्टपूर्ती लवकरात लवकर झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
जनप्रतिनिधींना सेवेची संधी देणारे अभियान
यावेळी उपस्थित जनप्रतिनिधींशी संवाद साधताना ते म्हणाले, मूलभूत गरजांनी गरिबांना समृद्ध करणारे हे अभियान आहे. शेवटच्या वंचित माणसाच्या आयुष्यात आनंद देणारी ही योजना आहे. योजनेबाबत अतिशय सक्रियतेने व नोंदी ठेवत काम करावे, प्रत्येक पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रभागांमध्ये कोणत्या कुटुंबाकडे गॅस नाही आहे याची नोंद असली पाहिजे. ज्यांच्याकडे गॅस नाही, शिधापत्रिका नाही व ज्यांना दोन व तीन रुपये किलो रुपयाचे धान्य मिळत नाही, अशा सर्व कुटुंबांच्या याद्या या जनप्रतिनिधींनी देखील स्वतःकडे ठेवाव्यात. त्यांना ही सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. या जनप्रतिनिधींना प्रशासन सहकार्य करेल. कोणी अडचण आणत असेल तर ती आपण दूर करू. त्यामुळे आपला जिल्हा पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या कार्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात अग्रेसर असावा. चांदा ते बांदा असे महाराष्ट्राचे वर्णन केल्या जाते त्यामुळे या योजनेचा चेहरा चंद्रपूर जिल्हा बनवा व चंद्रपूर जिल्ह्यात शंभर टक्के गॅस वाटप, शिधापत्रिका वाटप व अन्नधान्य वाटपाचे अभियान यशस्वी करा, असे आवाहन त्यांनी केले.
15 ऑगस्टला उद्दिष्ट्यपूर्ती करा…
 त्यांनी यावेळी जनप्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले की, गरीबांच्या कामी येणे, हेच आमच्या राजकीय जीवनाचे उद्दिष्ट असते. पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय हे अभियान अतिशय पुण्याचे काम असून आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येकाला याचा लाभ मिळेल, यासाठी अतिशय जागरूकतेने काम करावे. गरीबातल्या गरिबांना उत्तम प्राथमिक सुविधा, रेशन कार्ड, पिण्याचे पाणी व त्यांना आरोग्याच्या उत्तम सुविधा, शिक्षण देताना सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास या त्रिसूत्रीचा वापर करावा. 15 ऑगस्टपर्यत जिल्हयात प्रशासन व जनप्रतिनिधीनी मिळून उद्दिष्टयपूर्ती करावी, असा कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी दिला
प्रधानमंत्र्यांनी घ्यावी चंद्रपूरची नोंद…
      अभियानाची सुरुवात आपल्या जिल्ह्यापासून करायची असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील चंद्रपूर जिल्ह्यातील या क्षेत्रात केलेल्या कामाचा उल्लेख अभिमानाने मन की बात मध्ये करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे अतिशय रचनात्मक काम असून पुढचे 29 दिवस झोकून काम करून चंद्रपूर जिल्हा धूरमुक्त जिल्हा झाल्याची घोषणा 15 ऑगस्ट रोजी आपल्याला करता आली पाहिजे यासाठी सर्व पद्धतीचे नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
25 गावांमध्ये गरम पाण्याचा पथदर्शी प्रयोग
पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत या अभियाना मधून गॅस कनेक्शन एकदा दिले जाईल मात्र गॅसवर रोज आवश्यक असणाऱ्या गरम पाण्यात तापवणे पुरवठा येणार नाही अशी भीती अनेकांना आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी गावामध्ये गरम पाणी करण्यासाठी सोलर योजनेचे प्रयोग करण्यात आले आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील 25 गावांमध्ये गरम पाणी करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल व त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात देखील निकषांवर आधारित प्रकल्प सुरू केल्या जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे संचालन माधुरी संतोषराव यांनी तर प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेंद्र दांडेकर व सादरीकरण भारतकुमार तुंगडे यांनी केले.
000000

Friday, 12 July 2019

महिला बचत गटांना मोफत ट्रॅक्टर वाटप सोहळा



90 टक्के शासनाचे अनुदान तर उर्वरित 10टक्के हिस्सा पालकमंत्री भरणार

चंद्रपूरदि. 11 जुलै: महिलांसाठी विकासाच्या वाटा मोकळ्या व्हाव्यातत्यांनी प्रगती करावी या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील पाच महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वितरणाचा सोहळा आज 11 जुलै रोजी राज्याचे वित्तनियोजन,वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते नियोजन भवन येथे पार पडला. 90शासनाचे अनुदान व उर्वरित 10बचत गटांचा वाटा पालकमंत्री यांनीच भरला.
यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ शामकुळे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारसमाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णीमहिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे,अधिकारी-कर्मचारी  तसेच बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
 महाराष्ट्र शासन  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत 90अर्थसहाय्य देऊन ही योजना जिल्ह्यात राबवण्यात आली. विशेष म्हणजे उर्वरित 10असलेला बचत गटांनी भरायचा वाटा स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भरला. याद्वारे जिल्ह्यातील पाच स्वयंसहायता महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये करुणा स्वयंसहायता समूह चेक कोसंबीसंघटित महिला बचत गट पोंभूर्णारमाबाई महिला बचत गट फुटाणाधम्मदीप महिला बचत गट पोंभूर्णा व रमाई महिला बचत गट जुनगाव या गटांचा समावेश आहेया योजनेमुळे महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून स्वतःची शेती ट्रॅक्टरच्या माध्यमातून करता येणार असून किरायाने ट्रॅक्टर देऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय उभा करता येणार आहे या माध्यमातून महिलांची आर्थिक प्रगती साधली जाणार आहे व महिलांची स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे.
                                                0000

पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी आपले अधिकार लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरावे: ना. मुनगंटीवार




घरकुल वाटप दिव्यांग व रेन वॉटर हार्वेस्टिंग करिता अनुदान वाटप सोहळा

चंद्रपूरदि. 11 जुलै: असंख्य शहरात पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष असून मानवाचे मंगळावर पाणी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. भविष्यात पाण्याच्या एका थेंबासाठी डोळ्यातून दहा अश्रू गाळावे लागतील. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातलं चंद्रपूर शहर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाणी साठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन लोक चळवळीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करत आहे. ही कौतुकाची बाब असून शहरातील दिव्यांगांना अनुदान तसेच निवार्‍या पासून वंचित असलेल्या जनसामान्यांना घरकुल योजना राबवली जात आहे. यात सातत्य ठेवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी आपले अधिकार लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरावेअसे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  11 जुलै रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकाद्वारे आयोजित घरकुल हस्तांतरण रेनवॉटर हार्वेस्टिंग व दिव्यांगाकरिता अनुदान वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ शामकुळेमहानगरपालिकेच्या महापौर अंजलीताई घोटेकरमहानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडेउपमहापौर अनिल फुलझेलेस्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडेसभागृहाचे गटनेते वसंताभाऊ देशमुखमहिला व बालकल्याण सभापती शितल गुरनुलेसभापती कल्पना बाबुलकरसभापती सुरेश पचारेसभापती प्रशांत चौधरीउपसभापती चंद्रकला सोयाम मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
देशातील जनसामान्यांच्या अन्नवस्त्रनिवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री यांचा आग्रह असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लोकांना हक्काचं घर मिळत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाच टक्के निधी दिव्यांगांना स्वतःचा रोजगार उभा करण्याकरिता अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे. सोबतच असंख्य शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला जात असताना महानगरपालिकेच्या पुढाकाराने रेन वॉटर हार्वेस्टिंग ची लोकचळवळ यशस्वीरित्या राबवली जात आहे. या तीनही आघाड्यांवर महानगरपालिका यशस्वीरित्या काम करत आहे. ही प्रशंसनीय बाब असून याची दखल देशपातळीवर घेतली जाईल. अशा अशा पद्धतीने चंद्रपूर महानगरपालिकेने  काम करावेअसे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
            नद्यांच्या किनाऱ्यावरच मनुष्य सृष्टी तयार झाली. मानवाने नदीला माता मानलं. परंतु आज आज प्रचंड पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून पाणी पैशा सारखं खर्च केलं पाहिजेअसा सल्ला देण्याची वेळ आलेली आहे. पाणी शोधण्यासाठी मानव मंगळावर पोहोचलेला असून भविष्यात पाण्याचे एका थेंबासाठी डोळ्यातून दहा अश्रुचे थेंब गाळावे लागतीलअशी भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. काही शहरांना  रेल्वेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी आपण किती वर्षे पदावर राहतो. त्यापेक्षा मनुष्य य व वसुंधरेची किती सेवा केली. हे फार महत्त्वाचं असून पावसाचा प्रत्येक थेंब भूमातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी पक्षपात विसरून महानगरपालिकेच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या लोकचळवळीत सहभागी व्हावेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच या मोहिमेची शहरातील लोकांपर्यंत जाऊन जनजागृती करणाऱ्या इको प्रो या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
चंद्रपूर शहरातील विहिरींचे नूतनीकरण करावे तसेच बोरवेल नादुरुस्त असतील तर त्या दुरुस्त कराव्या. याकरता लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. अर्थसंकल्पात राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना घरकुल दिनाकरिता तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांनाही स्वतःचा रोजगार निर्माण करता यावा याकरिता इलेक्ट्रॉनिक वेहिकल च्या माध्यमातून चालतं फिरतं दुकान एक हजार लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यापैकी शंभर वाहन चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांगांना वाटप करण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांना किराणाहस्तकलाभाजीपालाखाण्याच्या वस्तू इत्यादींचे दुकान लावून स्वतःचा रोजगार निर्माण करता येणार आहेअशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
तत्पूर्वी महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी प्रस्तावना सादर करताना चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवले जाणारे विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच महानगरपालिकेच्या महापौर अंजलीताई घोटेकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 20 हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी पात्रतेत बसणाऱ्या 15 हजार कुटुंबांना हक्काचं घर महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणार आहेअशी माहिती त्यांनी दिली. या सोहळ्यात घरकुलरेनवॉटर हार्वेस्टिंग व दिव्यांगांना अनुदान योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी नानाभाऊ शामकुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महानगरपालिकेचे नगरसेवकअधिकारी-कर्मचारीविविध संस्थांचे पदाधिकारीविविध योजनांचे लाभार्थीपत्रकार तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                0000

जिल्‍हयातील शेवटच्‍या दिव्‍यांगाला स्‍वयंचलित तीन चाकी सायकल मिळेपर्यंत कार्यक्रम सुरू राहणार – सुधीर मुनगंटीवार



वरोरा येथे दिव्‍यांगांना स्‍वयंचलित तीन चाकी सायकल वितरणाचा कार्यक्रम

चंद्रपूर दि.11 जुलै - चंद्रपूर जिल्‍हयात एक हजार दिव्‍यांगांना स्‍वयंचलित तीन चाकी सायकल देण्‍याचे जरी आपण जाहीर केले असलेतरीही जिल्‍हयातील शेवटच्‍या दिव्‍यांगाला सायकल मिळेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. 80 टक्‍के दिव्‍यांगत्‍व असलेल्‍या दिव्‍यांग बांधवांना शासनातर्फे घरकुल बांधून देण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला असून या अर्थसंकल्‍पात त्‍यासाठी तरतूद सुध्‍दा करण्‍यात आली आहे. संजय गांधी निराधार योजनाश्रावणबाळ योजना या योजनांसाठीच्‍या अनुदानात सहाशे रूपयावरून एक हजार रूपये इतकी वाढ करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दिव्‍यांग बांधवांच्‍या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहीलअशी ग्‍वाही वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
            दिनांक 11 जुलै रोजी वरोरा तालुक्‍यातील आनंदवन येथे जिल्‍हा परिषदेच्‍या समाज कल्‍याण विभागातर्फे आयोजित अटल दिव्‍यांग स्‍वावलंबन मिशन अंतर्गत दिव्‍यांगांना स्‍वयंचलित तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी ज्‍येष्‍ठ समाजसेवक    डॉ. विकास आमटेभाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष व बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मावरोरा नगर परिषदेचे अध्‍यक्ष अहेतेशाम अलीजिल्‍हा परिषदेचे समाजकल्‍याण सभापती ब्रिजभूषण पाझारेकृषी सभापती अर्चना जिवतोडे, जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारेएसीसी चे महाप्रबंधक श्री. खटीवरोरा नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी श्री. बल्‍लाळ यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणालेज्‍या आनंदवन परिसरात हा कार्यक्रम संपन्‍न होत आहेत्‍या आनंदवनातून जाताना माणूस आनंद घेवून जातो व तो आनंद इतरांनाही देण्‍याचा प्रयत्‍न करतो. कर्मयोगी कै. बाबा आमटे यांची ही कर्मभूमी नेहमीच दिव्‍यांगांना आत्‍मनिर्भरतेचा संदेश देत आली आहे. हाच संदेश पुढे नेण्‍याचा आमचा प्रयत्‍न आहे. जे दिव्‍यांग व्‍यवसाय करू इच्‍छीतात त्‍यांना बॅटरी ऑपरेटेड वाहने अर्थात शॉप ऑन व्‍हेईकल देण्‍याचा निर्णय सुध्‍दा आम्‍ही केला आहे. त्‍या माध्‍यमातन भाजी विक्रीपेपर विक्री व अन्‍य व्‍यवसाय ते करू शकतील. संजय गांधी निराधार योजना तसेच सामाजिक अर्थसहाय्याच्‍या अन्‍य योजनांच्‍या लाभार्थ्‍यांना अर्थात वृध्‍दनिराधारदिव्‍यांग आदींना दोन महिन्‍यात अनुदानाचे पैसे न दिल्‍यास विलंबाला जबाबदार        अधिका-यांवर कडक कारवाई करण्‍यात येईलअसा ईशारा यावेळी बोलताना त्‍यांनी दिला. विधवा व निराधार महिलांना स्‍वयंरोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍या. यादृष्‍टीने विशेष कार्यक्रम शासन राबविणार असून यासाठी अर्थसंकल्‍पात तरतूद केली असल्‍याचे ना.सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
            यावेळी बोलताना डॉ. विकास आमटे म्‍हणालेअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात चंद्रपूर जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर झाला असून यापूर्वी कधी नव्‍हे इतका विकास जिल्‍हयातील नागरिक अनुभवत आहे. विशेषतः दिव्‍यांगांच्‍या चेह-यावर आनंद निर्माण व्‍हावा यासाठी ते गेली अनेक वर्षे सातत्‍याने प्रयत्‍नशील आहे. आनंदवन परिवार याचा साक्षीदार असल्‍याचेही विकास आमटे यावेळी बोलताना म्‍हणाले. यावेळी ब्रिजभूषण पाझारेहरीश शर्मा आदींची भाषणे झालीत. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.               0000