Search This Blog

Saturday, 2 May 2020

चंद्रपूर शहर परिसरातील अस्वलीस जेरबंद


चंद्रपूरदि 2 मे: ‌आज 02 मे  रोजी पहाटे 2 वाजता पासून तर सकाळी 8 वाजेपर्यंत शहरात अस्वलीचा मुक्त संचार होता. सकाळी 8 वाजता चंद्रपूर वनविभागांतर्गत चंद्रपूर शहर परिसरातील अस्वलीस जेरबंद केले.
रात्री दिड ते 2 च्या सुमारास वनविभागास स्थानिक नागरिकांकडून शहरात अस्वल असल्याची माहिती मिळाली. सुरूवातीस जटपुरा गेट परिसरामध्ये अस्वल दिसून आले होते. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर अस्वल संजय गांधी मार्केट मधून जटपुरा गेट परिसरातील हनुमान मंदिर नंतर बस स्टॅंडरेल्वे स्टेशन लगतची वस्तीजिल्हाधिकारी कार्यालयबंगाली कॉलनीआदर्श पेट्रोल पंपच्या बाजुची एमएसईबीचे केंद्रत्यानंतर बंगाली कैम्पशास्त्रीनगर आणि परत आदर्श पेट्रोल पंप समोरील सीएचएल हॉस्पिटलच्या लगत असलेल्या झुडूपात येऊन आश्रय घेतला.
जवळपास रात्री 2 ते 6 वाजेपर्यंत अस्वलीचा मागोवा घेत अस्वल पुढे,बचाव पथक मागे अशी स्थिती असतानामात्र दिवस उजाडल्यावर हॉस्पिटल बाजूच्या झुडूपात दडून बसली. यानंतर वनविभागाच्या बचाव पथकाने अस्वल बेशुद्ध करून पिंजरा जेरबंद केले.
सदर रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक लखमावाडवनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकरवनकर्मचारीमानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरेरॅपिड रीस्पाँस यूनिटचे कर्मचारीशूटर बेगमिलिंद किटेपशु वैद्यकीय अधिकारी कुंदन पोडचेलवारतर इको-प्रोचे वन्यजीव संरक्षक दल यी बचाव कार्यात सहभागी झाले होते. रेस्क्यू केल्यानंतर अस्वलीस वनविभागाचे तात्पुरते वन्यजीव उपचार केंद्रामध्ये हलविण्यात आले आहे.
00000

Friday, 1 May 2020

जिल्ह्यातील अन्नधान्य वाटप परिमाणानुसार होणार : राजेंद्र मिस्कीन


Ø  अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड गहू 15 किलो, तांदूळ 20 किलो, साखर 1 किलो मिळणार
Ø प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती गहू 3 किलो, तांदूळ 2 किलो मिळणार
Ø  एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजने अंतर्गत सुद्धा धान्य मिळणार
Ø  अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना 1 किलो डाळ मिळणार
चंद्रपूर,दि. 1 मे: जिल्ह्यामध्ये माहे मे 2020 मध्ये योजना निहाय अन्नधान्य वाटप परिमाण ठरलेले आहे. या परिमाणानुसार जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप होणार आहे.अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकात जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे.
अंत्योदय अन्न योजने अंतर्गत प्रति कार्ड 2 रुपये प्रति किलो दराने गहू 15 किलो, 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ 20 किलो तर 20 रुपये प्रति किलो दराने साखर 1 किलो मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 2 रुपये प्रति किलो दराने गहू 3 किलो, 2 रुपये प्रति किलो दराने  तांदूळ 2 किलो मिळणार आहे.
या व्यतिरिक्त अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना  या दोन्ही योजनेच्या रेशन कार्ड धारकांना प्रति मानसी 5 किलो तांदुळ मोफत म्हणजेच एका कार्डात 4 व्यक्ती असतील तर त्यांना 20 किलो तांदुळ मोफत मिळेल तसेच माहे मे -2020 महिण्यात या दोन्ही योजनेच्या प्रत्येक रेशनकार्डवर 1 किलो डाळ (चनाडाळ/तुरडाळ यापैकी जी उपलब्ध असेल ती) मोफत मिळणार आहे. म्हणजेच अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कटुंब योजनेच्या प्रत्येक कार्डधारकास नियमीत धान्य हे दर महिन्याप्रमाणे वरील दराप्रमाणे विकत घ्यावे लागेल व ते धान्य घेतल्यानंतर त्यांना 1 किलो दाळ व तांदुळ मानसी 5 किलो प्रमाणे मोफत मिळणार आहे.
उर्वरीत सर्व केशरी कार्ड धारकांना माहे मे महिन्यात प्रति मानसी 3 किलो गहु रुपये 8 प्रति किलो व 2 किलो तांदुळ रुपये 12  प्रमाणे त्यांचे कार्ड ज्या दुकानात नोंदविले आहे त्याच दुकानातुन मिळेल.
केंद्र शासनाने एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजने अंतर्गत काही राज्या सोबत आंतरराज्य पोर्टबिलीटीची सुविधा उपलब्ध करुन दिली असुन त्यात प्रामुख्याने तेलंगनाआंध्रप्रदेशगुजरातराज्यस्थानउत्तरप्रदेश व बिहार या राज्याचा समावेश असुन कोविड-19 मुळे त्या राज्यातील अडकलेल्या किंवा इकडे राहत असलेल्या रेशन कार्डधारकांना महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या रेशन दुकानातुन धान्य घेण्याची मुभा असल्याने अशा परराज्यातील ज्या लोकांकडे त्यांचे रेशनकार्ड असेल त्यांना चंद्रपुर जिल्ह्यातील रास्तभाव दुकानातुन माहे मे, 2020 मध्ये धान्य वितरीत करण्यात येईल. याबाबत सर्व संबंधीत लोकांनी तसेच सर्व रास्तभाव दुकानदारानी नोंद घ्यावी.
कोवीड-19 कोरोना विषाणुचे प्रादुर्भावामुळे जिल्हयात शासनस्तरावर व जिल्हाधिकारीचंद्रपुर यांनी काही निर्बंध घातले असुन त्यानुसार जिल्हयातील सर्व रास्तभाव दुकाने ही  जिल्हाधिकारी यांनी ठरवुन दिलेल्या वेळेत म्हणजेच सकाळी 8 ते  दुपारी 2 या वेळेतच उघडे ठेवून कार्डधारकांना लाभार्थ्यांना धान्य वाटप करायचे आहे. केंद्र शासनाचे सुचनेनुसार माहे मे,2020 महिन्यात धान्य वाटप करतांना ईपॉस मशिनवर प्रत्यक्ष कार्डधारकांचा लाभार्थ्याचा अंगठा लावायचा आहे. त्यानुसार ज्याचे नाव रेशनकार्डात आहे व आधार क्रमांक नोंदलेला आहे.अशाच व्यक्तीने धान्य घेण्यासाठी दुकानात जायचे आहे. दुकानदारांनी धान्य घेण्यास येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याकरीता हात धुण्याकरीता साबण व पाण्याची व्यवस्था करायची आहे.
कार्डधारकांनी दुकानात धान्य घेतेवेळी  सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असुन मास्क घालणे आवश्यक आहे. धान्याचे वितरण जरी तारखेपासुन सुरु होणार असले तरी सर्व दुकांने ही दररोज उघडी राहणार असल्याने ग्राहकांनी एकाच दिवशी दुकानात गर्दी करु नये. तसेच ज्यांचेकडे रेशनकार्ड नाही अशा व्यक्तीनी उगाचच चौकशी करण्याकरीता रास्तभाव दुकानात त्रास देवु नये त्यांना काही चौकशी करायची असल्यास संबंधीत तहसिल कार्यालयाकडे किंवा प्रसिध्द केलेल्या हेल्पलाईन क्रमाकांवर सपंर्क साधवा. जिल्हयातील सर्व दुकानदारांना त्यांचे दुकानात नोंदलेला कार्डधारकांचे प्रमाणातच धान्य वितरीत केल्या जाते. त्यामुळे रेशनकार्ड नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने दुकानदाराना धान्याची मागणी करु नये किंवा त्यांचेवर दबाव आणु नये. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे.
00000

जिल्ह्याबाहेरील नागरिकांनी संयम ठेवावा ; प्रत्येकाला जिल्ह्यात आणण्यासाठी मदत करणार : ना. वडेट्टीवार


स्थलांतरितांना आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू
Ø  चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्येच जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा
Ø  स्थलांतरितांना आणण्याची कारवाई पुढची अनेक दिवस चालणार
Ø  चंद्रपूरमध्ये पालकमंत्री समन्वयन कक्षाचे गठण
Ø  स्थलांतरितांशिवाय सामान्य नागरिकांसाठी पोलिसांकडूनच परवानगी
Ø  जिल्ह्यातील 60 विद्यार्थी कोटा शहरातून परतले
Ø  सर्व विद्यार्थी 14 दिवसांसाठी होम कॉरेन्टाइन करण्यात आले
चंद्रपूर,दि 1 मे : राज्य शासनाने 30 एप्रिल रोजी राज्याबाहेरच्या व राज्यातील इतर ठिकाणच्या नागरिकांना जिल्ह्यामध्ये आणण्याची परवानगी दिल्यानंतर प्रशासन गतीने कामी लागले आहे. ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार असून नागरिकांनी एकाच वेळी गोंधळ न करता ज्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत त्या जिल्ह्याच्या प्रशासनाची संपर्क साधण्याचे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
अन्य राज्यात अडकून पडलेल्या मजूरश्रमिकविद्यार्थीप्रवासीव्यापारीसर्वांनाच जिल्ह्यांमध्ये आणण्यासाठी जिल्हा प्रशासन राज्यशासनाने सांगितल्याप्रमाणे रणनीती आखत आहे. प्रत्येक नागरिकाला जिल्ह्यात आणण्यासाठी मदत केली जाईल.  प्रत्येकाला जिल्ह्यामध्ये परत आणले जाईल. यासाठी जिल्हा प्रशासना सोबतच आपली यंत्रणादेखील काम करत असून पालकमंत्री समन्वय कक्षाची आजपासून स्थलांतरासाठी सुरुवात करत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
बाहेर जिल्ह्यात राज्यात ओळखलेल्या नागरिकांनी ज्या जिल्ह्यात ते अडकले आहेत. त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची तालुका प्रशासनाची संपर्क साधणे आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात यात अडकून पडलेल्या आहात त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने ते चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांबाबतही अन्य राज्यांना व जिल्ह्यांना माहिती प्रशासनामार्फत दिली जात आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वप्रथम ते ज्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्या प्रशासनाकडे आपली माहिती द्यावीअसे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केले आहे.
ज्या जिल्ह्यात या ठिकाणी अडकले आहेत. त्या प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रवास करण्याविषयी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याठिकाणी वैद्यकीय तपासणी देखील प्रवाशांची केली जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे प्रवासाची परवानगी मिळणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून  24 तास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी 5 दूरध्वनी लाईन सुरू केल्या असून 07172-274166,67,68,69,70 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.तसेच सोबतच राज्यातील पुणे-मुंबई व इतर शहरांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी वरील क्रमांकावर आपली माहिती देण्याचे स्पष्ट केले आहे.
पालकमंत्री समन्वयन कक्ष दरम्यान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विशेष कार्य अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मुख्य समन्वयात ब्रह्मपुरीसिंदेवाहीसावलीबल्लारपूरपोंभुर्णा या 5 तालुक्यांसाठी श्री. प्रदीप गद्देवार (8007203232) मुल नागभीड राजुरा कोरपना चिमूर या तालुक्यांसाठी श्री. उमेश आडे (9404235449) चंद्रपूरवरोराजिवती,गोंडपिंपरी,भद्रावती तालुक्यासाठी श्री. सुधीर पंदीलवार (9175991100)  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रीन झोनमध्ये :जिल्हाधिकारी  
चंद्रपूर  जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. नागपूर येथे चंद्रपूर मूळ नागरिक असणारे विदेशातील 2 नागरिक पॉझिटिव्ह आले होते ते नागरिक धोक्याबाहेर असून सध्या नागपूर येथे उपचार घेत आहे. जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही अद्याप तसा कोणताही अहवाल कोणाचा आलेला नाही राज्य शासनाच्या काही वेबसाईटवर नागपूर मध्ये असलेल्या या रुग्णांचा चंद्रपूर शहराच्या नावावर उल्लेख दाखविण्यात येतो मात्र हा उल्लेख चुकीचा असून चंद्रपूर जिल्हा एकही रुग्ण नसलेला जिल्हा आहे असा खुलासा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केला आहे.
53 विद्यार्थी कोटावरून परतले राजस्थानमधील कोटा येथे विविध अभ्यासक्रमासाठी अडकून पडलेल्या जिल्ह्यातील 53 विद्यार्थ्यांचे चंद्रपूर शहरांमध्ये आज आगमन झाले. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील 14 दिवस होम कॉरेन्टाईन करण्यात आले. राज्य शासनाने कोटा येथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बीड येथून विशेष बसेस सोडल्या होत्या प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरापर्यंत सोडण्यात आले आहे. हे विद्यार्थी देखील शहरात आज पोहोचले आहे.
            जिल्ह्यात 1‌ मे रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 114 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  106 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 98 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 7 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातूनराज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 34 हजार 197 आहे. यापैकी 2 हजार 258 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 31 हजार 939 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 220 आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.
            संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील 306 प्रकरणात एकूण 16 लाख 33 हजार 570 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1047 वाहने जप्त केली आहेत.
00000

प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सीसीडी कट्टा मित्र परिवाराकडून मदत


आणखी मदतीचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन
चंद्रपूरदि.मे: राज्यावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेक निराश्रित गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळावे यासाठी राज्यशासन व प्रशासन काम करीत आहे. तसेच आरोग्य व्यवस्था व इतर वैद्यकीय मदतीसाठी प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी मदत केली आहे.
स्व. सुशील महातव यांचे कर्करोगाच्या उपचारासाठी सीसीडी कट्टा मित्र परिवार जिल्हा स्टेडियम चंद्रपूर यांच्याकडून निधी जमा करण्यात आलेली होता. त्यातील शिल्लक रकमेतून प्रधानमंत्री सहाय्यता निधीला 50 हजारतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 54 हजार  रुपयाचा धनादेश सीसीडी कट्टा मित्रपरिवार प्रवीण गुज्जनवारमारोती पुनवटकरप्रकाश सुर्वेहेमंत घिवेमकरंद खाडेअभय बनपूरकरप्रवीण चवरेसोनू गज्जलवारसचिन भिलकर  यांनी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांना देऊन सहाय्यता निधीला मदत केली.
मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. 
या खात्यामध्ये जमा करता येणार मदत:
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19, बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडियामुंबई मुख्य शाखाफोर्टमुंबई 400023, शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300 या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत करता येणार आहे. सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. 
कोरोना आजाराच्या नियंत्रणासाठी मदत करायची असल्यास त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वरील दिलेल्या खात्यामध्ये मदत करावी. किंवा मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये द्यायचा असल्यास फक्त दोनच व्यक्ती येऊन हा धनादेश द्यावा जेणेकरून गर्दी टाळल्या जाईल व आपल्याला मदतही  करता येईलअसे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
0000

चंद्रपूर येथे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण


कोरोना विरूध्दच्या लढयात सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन

         चंद्रपूर दि 01 मे : चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज महाराष्ट्र दिनाला राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कोरोना विरुद्धच्या लढयात सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
       कोरोना आजाराच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मर्यादित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुलेजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले प्रामुख्याने उपस्थित होते.
         ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील जनतेला व्हिडिओ संदेश देताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात ज्या थोर विभूतींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांना अभिवादन केले. जिल्ह्यातील समस्त जनतेला त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावर कोरोना आजाराचे संकट असताना एकत्रित प्रयत्नातून या आजारावर विजय मिळविण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयाअसे आवाहन त्यांनी केले.
          जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे आगामी काळात देखील प्रशासनासोबत प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घेत जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव होणार नाहीयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
         याकाळात रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरशहरांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्ष असणारे पोलीस व उपाययोजना करणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला नागरिकांनी सहकार्य करावे. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन देखील त्यांनी केले.
       जिल्हा बाहेर असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनाविद्यार्थ्यांनाप्रवाशांना मजुरांना जिल्ह्यामध्ये आणण्याचे मोठे काम आगामी काळात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून होणार आहे. या काळात शारीरिक अंतर ठेवत अतिशय बारकाईने स्थलांतरितांचा गुंता सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 0000000