आणखी मदतीचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन
चंद्रपूर, दि.1 मे: राज्यावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेक निराश्रित गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळावे यासाठी राज्यशासन व प्रशासन काम करीत आहे. तसेच आरोग्य व्यवस्था व इतर वैद्यकीय मदतीसाठी प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी मदत केली आहे.
स्व. सुशील महातव यांचे कर्करोगाच्या उपचारासाठी सीसीडी कट्टा मित्र परिवार जिल्हा स्टेडियम चंद्रपूर यांच्याकडून निधी जमा करण्यात आलेली होता. त्यातील शिल्लक रकमेतून प्रधानमंत्री सहाय्यता निधीला 50 हजार, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 54 हजार रुपयाचा धनादेश सीसीडी कट्टा मित्रपरिवार प्रवीण गुज्जनवार, मारोती पुनवटकर, प्रकाश सुर्वे, हेमंत घिवे, मकरंद खाडे, अभय बनपूरकर, प्रवीण चवरे, सोनू गज्जलवार, सचिन भिलकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांना देऊन सहाय्यता निधीला मदत केली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.
या खात्यामध्ये जमा करता येणार मदत:
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19, बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023, शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300 या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत करता येणार आहे. सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
कोरोना आजाराच्या नियंत्रणासाठी मदत करायची असल्यास त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वरील दिलेल्या खात्यामध्ये मदत करावी. किंवा मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये द्यायचा असल्यास फक्त दोनच व्यक्ती येऊन हा धनादेश द्यावा जेणेकरून गर्दी टाळल्या जाईल व आपल्याला मदतही करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
0000
No comments:
Post a Comment