Search This Blog

Tuesday 12 May 2020

जिल्हा सहाय्यता निधीत आतापर्यंत 71 लक्ष ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 1 कोटी रुपये जमा


जिल्हा सहाय्यता निधीत आतापर्यंत 71 लक्ष ;
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 1 कोटी रुपये जमा
प्रशासनाचे मदतीचे आवाहन
चंद्रपूर, दि. 12 मे : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सरकारीसहकारी संस्था व दानशूर  व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना संकट निवारण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नयेयासाठी  मदतीचे आवाहन करण्यात येत असून आजपर्यंत सुमारे 71 लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी सहाय्यता निधीसाठी तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात 1 कोटी 17 लक्ष 16 हजार रुपये उपलब्ध झाले आहे.
         आज प्रामुख्याने जिल्हा सहायता निधीमध्ये श्रीकृष्ण राईस मिल तळोधी (बा) व्यंकटेश राईस इंडस्ट्रीज तळोधी (बा)गुप्ता राईस एक्सपोर्ट नागपूर यांच्यावतीने प्रत्येकी रु.11 हजार,संजय रामदास पांडे चंद्रपूर  यांच्याकडून रु.15 हजार 500, रुपयाचा धनादेश सहाय्यता निधी देण्यात आला. तर ऐश्वर्या ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था पळसगावआदिवासी विविध कार्यकारी सह.पतसंस्था जांभुळघाटश्रीराम ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था ब्रह्मपुरी सहकारी संस्थांच्या वतीने प्रत्येकी रु.5 हजार रुपयाचा धनादेश सहाय्यता निधीस देण्यात आला.
त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये विस्तार अधिकारीचंद्रपूर (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा)  प्रीती वेल्हेकर यांच्याकडून रु.55 हजार 453, रवींद्र येनारकर चंद्रपूर यांच्याकडून रु.41 हजार, इंदिरा गांधी गार्डन स्कूल रामनगर,चंद्रपूरच्या वतीने रु.41 हजारन्यू इंग्लिश हायस्कूल चंद्रपूरच्या वतीने रु.23 हजार, श्री बालाजी हायस्कूल बामणीबल्लारपूरच्या वतीने रु.12 हजार 100, अवंथा होल्डिंग युनिट लिमि.आष्टीच्या वतीने रु.1 लक्ष 33 हजार 291 तर बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट लिमिटेड युनिट आष्टीच्या वतीने रु.1 लक्ष 37 हजार 828 मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले.
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे.
कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 असून यासाठी आयएफएससी कोड SBIN0000300 असा आहे.
जिल्ह्यातील उद्योजककंपन्यांचे प्रमुखस्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात. त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment