Search This Blog

Monday 25 May 2020

चंद्रपूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22

चंद्रपूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22
मूल तालुक्यातील चिरोली येथील संपर्कातील 26 वर्षीय महिला बाधित
चंद्रपूर, दि. 25 मे :चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या एका महिलेला आज कोरोना पॉझिटिव्ह जाहीर करण्यात आले. कालपर्यंत जिल्ह्यामध्ये 21 पॉझिटिव्ह रुग्ण होते. सोमवारी ही संख्या 22 झाली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यासंदर्भात आज माहिती देताना बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी व अन्य लोकांच्या आरोग्यासाठी गृह अलगीकरणाचे नियम पाळावे. आरोग्य यंत्रणेला वेळोवेळी अवगत करावे तसेच पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांनी योग्य प्रतिसाद द्यावा. घाबरून जाऊ नये, योग्य औषधोपचाराने कोरोना संदर्भातील रुग्ण लवकर बरे होत असून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 संक्रमित रुग्णांची संख्या 22 असून 7 रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले आहे. व 14 रुग्णांना कोविड केअर सेंटर,वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. तरएक रुग्ण निगेटिव्ह आल्यामुळे कोविड-19 संक्रमित आलेल्या रुग्णांमधून कमी करण्यात आल्याने सध्या जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 21 आहे.
जिल्ह्यात कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे व कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.  आयएलआय,सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.
कोविड-19 संक्रमित 22 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1,मुंबई-3, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.
संशयित रुग्णांचे आवश्यकतेनुसार कोविड-19 तपासणीसाठी नमुने घेण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात 8 व महानगरपालिका क्षेत्रात 3 असे एकूण 11 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
कंटेनमेंट झोन क्र.1 बिनबा गेट येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 9 असून सर्वच 9 नमुने निगेटिव्ह आहेत.तसेच, 4 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे.
कंटेनमेंट झोन क्र.2 दुर्गापुर मधील वार्ड क्र. 3 येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 6 असून 5 नमुने निगेटिव्ह आहे.तर 1 नमुना प्रतीक्षेत आहे.तर, 5 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण झाले.
कंटेनमेंट झोन क्र.3 विसापूर बल्लारपूर येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 6 आहे. 1 नमुना पॉझिटिव्ह असून 2 निगेटिव्ह आहे.तर 3 नमुने प्रतीक्षेत आहे.तसेच,11 आरोग्य पथकामार्फत 516 घरांचे सर्वेक्षण  झाले.
कंटेनमेंट झोन क्र.4 जाम तुकुम पोंभुर्णा येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 3 असून सर्वच 3 नमुने निगेटिव्ह आहेत. तसेच, 5 आरोग्य पथकामार्फत 310 घरांचे सर्वेक्षण झाले.
कंटेनमेंट झोन क्र.5 चिरोली मुल येथे एकुण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 2 असून 1 पॉझिटिव्ह तर 1 नमुना प्रतीक्षेत आहे. तसेच,22 आरोग्य पथकामार्फत 1 हजार 97 घरांचे सर्वेक्षण झाले.
कंटेनमेंट झोन क्र.6 विरव्हा सिंदेवाही येथे एकुण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 13  आहे.यापैकी, 4 पॉझिटिव्ह असून 6 नमुने निगेटिव्ह आहे तर 3 नमुने प्रतीक्षेत आहे.तसेच, 3 आरोग्य पथकांमार्फत 173 घरांचे सर्वेक्षण झाले.
कंटेनमेंट झोन क्र.7 लक्कडकोट राजुरा येथे एकुण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 14  असून 12 निगेटिव्ह तर 2 नमुने प्रतीक्षेत आहे. तसेच, 12 आरोग्य पथकामार्फत 516 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.
कंटेनमेंट झोन क्र.8 बाबुपेठ चंद्रपूर येथे एकुण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 4  आहे.यापैकीसर्वच 4 नमुने निगेटिव्ह  आहे. तसेच, 3 आरोग्य पथकामार्फत 131 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.
कंटेनमेंट झोन क्र.9 दुर्गापुर वार्ड क्रमांक 2  चंद्रपूर येथील अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्ती 5 असून कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्ती 31 आहे. तसेच, 4 आरोग्य पथकामार्फत 74 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.
कंटेनमेंट झोन क्र.10 बालाजी वार्ड  चंद्रपूर येथील अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्ती 3 असून कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्ती 11 आहे. तसेच, 2 आरोग्य पथकामार्फत 69 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.
कंटेनमेंट झोन क्र.11 घुग्घुस चंद्रपूर येथील अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्ती 2 असून कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्ती 15 आहे. तसेच, 4 आरोग्य पथकामार्फत 74 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.
जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 797 आहे. यापैकी 22 व्यक्ती पॉझिटिव्ह असून 688 निगेटिव्ह आहे. तर, 87 व्यक्तींचा नमुना अहवाल प्रतीक्षेत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 140 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी तालुकास्तरावर 1 हजार 794 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 346 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात  आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गृह अलगीकरण पूर्ण झालेले 55 हजार 866 व्यक्ती आहेत. तर 13 हजार 800 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
00000

No comments:

Post a Comment