Search This Blog

Tuesday 26 May 2020

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22
एक रुग्ण कोरोना मुक्त
Ø  चार हजारावर नागरीकांचे संस्थात्मक अलगीकरण
Ø  56 हजारावर नागरिकांचे गृह अलगीकरण पुर्ण
चंद्रपूरदि. 26 मे :जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 संक्रमित रुग्णांची संख्या 22 असून 7 रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले आहे. व 14 रुग्णांना कोविड केअर सेंटर,वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. तरएक पॉझिटीव्ह 16 व 17 मे रोजी पुन्हा घेण्यात आलेल्या चाचणीनंतर रुग्ण निगेटिव्ह आल्यामुळे कोविड-19 संक्रमित आलेल्या रुग्णांमधून कमी करण्यात आला.आता पर्यंत जिल्ह्यात 22 रुग्ण होते. हा एक रूग्ण वगळता सध्या जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 21 आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्ह्यात कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे व कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.  आयएलआय,सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.
कोविड-19 संक्रमित 22 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1,मुंबई-3, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.
संशयित रुग्णांचे आवश्यकतेनुसार कोविड-19 तपासणीसाठी नमुने घेण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात 8 व महानगरपालिका क्षेत्रात 3 असे एकूण 11 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात सध्या एकूण 11 कंटेनमेंट झोन सुरु असून अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या 103 व कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या 94 असे एकूण 197 संपर्कातील व्यक्तींची संख्या असून 104 संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 7 पॉझिटिव्ह, 41 निगेटिव्ह, 56 प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 830 आहे. यापैकी 22 व्यक्ती पॉझिटिव्ह असून 715 निगेटिव्ह आहे. तर, 93 व्यक्तींचा नमुना अहवाल प्रतीक्षेत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 529 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी ग्रामस्तरावर 3 हजार 721,
तालुकास्तरावर 482 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 326 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात  आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गृह अलगीकरण पूर्ण झालेले 56 हजार 680 व्यक्ती आहेत. तर 13 हजार 291 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
00000

No comments:

Post a Comment