Search This Blog

Wednesday 20 May 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून मोहल्ला समिती गठित

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
 महानगरपालिका प्रशासनाकडून मोहल्ला समिती गठित
चंद्रपूर दि.20 मे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार जिल्ह्यात व शहरात होऊ नये यासाठी आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी नियमित व्हावी तसेच  आलेल्या नागरिकांना 14 दिवस  होम क्वारेन्टाईन करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाकडून व जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहे.या सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका झोन क्र. 2 अंतर्गत येणाऱ्या एकोरी प्रभाग क्र. 10 मध्ये मोहल्ला समिती गठीत करण्यात आली आहे.
देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यात व परजिल्ह्यात अडकलेले मजूरपर्यटकभाविकविद्यार्थी व इतर नागरिक यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जाण्यास शासनाद्वारे निश्चित कार्यपद्धती ठरवून परवानगी देण्यात आली आहे.चंद्रपूर शहरातील अनेक नागरिक,मजूरपर्यटकभाविकविद्यार्थी हे परराज्यात व परजिल्ह्यात अडकलेले असून त्यांचा शहरात प्रवेश सुरू झाला आहे.
नागरिकांचे आरोग्य्‍ धोक्यात येऊ नये यासाठी प्रभागामध्ये मोहल्ला समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रशासनातील अधिकारीप्रभागातील नगरसेवक  व सामाजिक संस्थेचे सदस्य यांचा समावेश आहे.
समितीमध्ये प्रभागातील नगरसेवक अशोक नागपुरे मो.क्र.9822567647, श्रीमती वीणा खनके मो.क्र.9665104275, सकीना रशीद अन्सारी मो. क्र.9405717868, दीपक जयस्वाल 7030786208, सहाय्यक आयुक्त,महानगरपालिका धनंजय सरनाईक मो.क्र.9850427394, वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती राजुरवार 9405901089, प्रभाग अधिकारी नरेंद्र बोबाटे 9423642730, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बनकर 9421958085 तर सामाजिक संघटना इको-प्रोचे नितीन रामटेके 9960011500, सामाजिक संस्थेचे प्रतिक हरणे 8888832227 यांचा समावेश आहे.
परराज्यातून व परजिल्ह्यातून शहरात येणाऱ्या व्यक्तींनी होम क्वारेन्टाईन करण्यात आलेल्या 14 दिवसाच्या कालावधीतघरीच राहणे बंधनकारक असल्यामुळे या काळात संबंधित व्यक्तींनी घराबाहेर पडू नयेतसे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर रु. हजार दंड तसेच भा.दं.वि संहितेचे कलम 188,269,270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रक्रियेमध्ये सक्रीय सहभाग नोंदवून कोरोनाला प्रतिबंध घालण्यात हातभार लावावा,असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केली आहे.
00000

No comments:

Post a Comment