Search This Blog

Thursday 21 May 2020

आजपासून जिल्हा अंतर्गत किमान प्रवासी क्षमतेसह बस सेवा सुरू

आजपासून जिल्हा अंतर्गत
किमान प्रवासी क्षमतेसह बस सेवा सुरू
जिल्हा प्रशासनाची परवानगी
चंद्रपूरदि. 21 मे : जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली असून आजपासून जिल्हा अंतर्गत किमान प्रवासी क्षमतेसह बस सेवा सुरु होणार आहे.असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिला आहे.
केंद्र व राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे लॉकडाऊन असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 31 मेपर्यंत जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कायम  राहणार आहे. परंतु, जिल्हांतर्गत प्रवास करण्यासाठी आता परवानगीची मुभा देण्यात आली होती. या सोबतच जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हयाअंतर्गत खाजगी वाहतुकीसह आता सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस सेवा सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे.
जिल्हा अंतर्गत प्रवासा करिता बस सेवा किमान 50 टक्के प्रवासी क्षमतेसह आज पासून सुरू करण्यात आली आहे. सदर बस सेवा हि संपुर्ण जिल्हयामध्ये सुरू करण्यात आली आहे. बस प्रवास करीत असताना सामाजिक अंतर ठेवुण व निर्जंतुकीकरण करूनच  प्रवास करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
हि बस सेवा  31 मे पर्यंत सुरू असलेल्या टाळेबंदी पर्यंत असेल.मात्र सायंकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यान वाहतुकीस प्रतिबंध आहे.असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
00000

No comments:

Post a Comment