Search This Blog

Monday 11 May 2020

कोरोना नियंत्रणासाठी पडद्या मागील योद्ध्यांचा 51 दिवसांचा लढा

कोरोना नियंत्रणासाठी पडद्या मागील योद्ध्यांचा 51 दिवसांचा लढा
चंद्रपूर, दि. 11 मे : गेल्या 51 दिवसांपासून सामान्यातल्या सामान्य माणसांपासून  प्रशासनातल्या अनेकांचा  विविध आघाड्यांवर  कोरोना आजाराची  लढा सुरू आहे. हा लढा पुढेही सुरू राहणार आहे. या लढ्यामध्ये  व्यवस्था म्हणून अनेक अशीही नावे आहेत  जी  निमूटपणे आपलं काम लोकहितासाठी 10 ते 14 तास दररोज करीत आहे. या सर्वांचे कुटुंब ,आप्तस्वकीय  प्रचंड चिंतेत असताना  केवळ  समाजाच्या भल्यासाठी  काहींची रात्रंदिवस धडपड सुरू आहे.अशी धडपड सुरू असणाऱ्या जिल्हा नियंत्रण कक्षाच्या पडद्यामागच्या अधिकाऱ्यांच्या कामाला सलाम करणारा हा वृत्तांत...
हा प्रवास गेल्या 2 महिन्यांचा आहे. कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्याचे शासनाने जाहीर केले. त्यानंतर चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार ,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे नेतृत्वाखाली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या गेल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे मार्गदर्शनात कोरोना विरुध्द लढण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षजिल्हा कोरोना अलगीकरण (कॉरन्टाईन) पथकजिल्हा कोराना अहवाल व नोंदवह्या पथककोरोना प्रतिबंधात्मक  कार्यवाही कृतीदलसंपर्क संवाद व आकस्मीक उपाययोजना व मदत पथकप्रशासकीय नियंत्रण पथकजिल्हा सर्व्हेक्षण पथक अशा प्रकारची विविध पथके तयार करुन चंद्रपूर जिल्हा प्रशासन कोरोना विषाणुशी लढण्यास सज्ज झाले. 
            आता जाणून घेऊ या... कार्यकक्षा आणि प्रत्यक्ष कामाची पद्धत.जिल्हयात कोरोना नियंत्रणा संदर्भात एक अवैद्यकिय पथक तयार करण्यात आले असून त्याची जबाबदारी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे तसेच मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकरयांचेवर जबाबदारी सोपविलेली आहे व त्यांना सहाय्यक म्हणुन धनंजय पाल व प्रणव बक्षी काम पाहात आहे. अशा प्रकारची प्रतिबंधात्मक व्युहरचना करुन चंद्रपूर जिल्हा कोरोनाशी लढा देत आहे.   
                        कोरोना नियंत्रण कक्षामार्फत नविन संशयितांची यादी तयार करुन नविन व जुन्या संशयित व्यक्तींना संपर्क झाल्याची खात्री केल्या जाते. आतापावेतो 1763 दुरध्वनी संदेश कंट्रोल रुमला प्राप्त झाले आहे.  1760 नागरिकांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.  सदर कक्षाचे काम डॉ. माधुरी मेश्रामडॉ. मिना मडावी या पाहात आहेत. नियंत्रण कक्षा अंतर्गत कोरोना अलगीकरण पथक तयार करण्यात आले असुन डॉ.ललीत पटलेहे पथक प्रमुख म्हणुन व डॉ. भट्टाचार्य सहाय्यक म्हणुन काम पाहात आहेत.  कंट्रोल रुम मधील कॉलसेंटर तयार केले गेले असुन त्याद्वारे आतापावेतो एकुण 20441 नागरिकांशी दुरध्वनीद्वारे संपर्क करण्यात आलेला आहे.  अलगीकरण पथकाद्वारा विदेशातुन चंद्रपूर जिल्हयात आलेल्या एकुण 204 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले.  संस्थात्मक कॉरंन्टाईन केलेल्या 490 व्यक्तींपैकी 312 नागरिकांना 14 दिवस पुर्ण झाले व सध्या 178 नागरिक संस्थात्मक कॉरंन्टाईन मध्ये आहे. तसेच राज्या बाहेरील व जिल्हयाबाहेरील एकुण 48144 व्यक्तींशी पथकाद्वारे संपर्क करण्यात आला.  पैकी  36321 लोकांचे 14 दिवसाकरिता होम कॉरंन्टाईन करण्यात आले. 
                        भारत सरकारच्या आय.डी.एस.पी सेल व राज्य आय.डी.एस.पी सेलच्या वेळोवेळी प्राप्त मार्गदर्शक सुचनानुसार चंद्रपूर जिल्हयात आय.डी.एस.पी.सेल कार्यरत असुन त्याचे प्रमुख जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. सुधिर मेश्राम हे काम पाहात आहे.  आय.डी.एस.पी.सेल द्वारा 2 प्रकारचे सर्व्हेक्षण सुरु आहे. प्रत्यक्ष सर्व्हेक्षण मध्ये आशा वर्करए.एन.एमआंगणवाडी सेविकाआरोग्य सेवक/सेविकाशिक्षक गाव व शहरी पातळीवर मोठ्याप्रमाणात सर्व्हेक्षणाचे काम करित आहे. तर अप्रत्यक्ष सर्व्हेक्षण मघ्ये आय.एल.आय व सारीच्या केसेस बाबत आरोग्य संस्थांकडून माहिती मिळवून जसे वैद्यकिय महाविद्यालयमहानगर पालिका व जिल्हा रुग्णालय यांचेशी समन्वय व संपर्क साधून अहवाल व माहिती प्राप्त करुन घेऊन प्राप्त झालेल्या सुचनानुसार अशा रुग्णांशी संपर्क करुन  फॉलोअप  घेण्यात येत आहे.
सध्या जिल्हयात आय.एल.आय.ची 8927 रुग्ण सापडली तर सारीची एकुण 110 रुग्ण आहे.  सदर सर्वेक्षणातुन सापडलेल्या वरील रुग्णांचा स्वॅब घेण्यात येत आहे व या माध्यमातुन कोविड 19 च्या केसेस शोधण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.  या सेल मधुन रोज सकाळी सदर कामाकरिता आरोग्य सहाय्यक नितीन झोडेहे संस्थात्मक अलगीकरण कक्षास भेट देऊन अहवाल संकलीत करतात.  सदर अहवाल दुपारी 01 ते 02 पर्यंत कोविड 19 संबंधातील एकुण 21 प्रपत्रातील माहिती तयार करुन शासनास पाठविण्यात येते.  आता जिल्हयातील ताप सदृष्य रुग्णांची माहिती  सुध्दा घेणे सुरु केले आहे.  यामधुन कोविड 19 चे रुग्ण शोधण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.   जिल्ह्यात आतापावेतो संशयित रुग्णांचे एकुण 194 स्वॅब घेण्यात आले.त्यापैकी 175 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह  तर 1 रुग्णाचा पॉझेटीव्ह तपासणी अहवाल प्राप्त झाला. 18 नमुना तपासणी अहवाल येणे बाकी आहे. 
                        जिल्हयातील स्थिती बाबतची माहिती अद्यावत करुन शासनाचे covid-19.nhp.gov.in या वेबसाईटवर अपडेट केली जात आहे.  तसेच आरोग्य व शासनाने पुरविलेल्या माध्यमांवर माहिती अपडेट केली जात आहे.  जिल्हा स्तरावर फीवर क्लिनीक सेंटर व प्रा. आरोग्य केंद्र स्तरावर फीवर  स्क्निींग सेंटर तयार करण्यात आले आहे व ईन्फ्रारेट थर्मल स्कॅनरद्वारा नागरिकांचे टेंपरेचर स्कॅन केल्या जात आहे.
                        कोविड 19 संबंधात कोरोना अहवाल व नोंदवह्या पथक तयार केले असुन डॉ. प्रकाश साठे हे पथक प्रमुख व डॉ. अखिल कुरेशी सहाय्यक म्हणुन काम पाहात आहेत.  नोंदवह्या अद्यावत करुन गोषवारे तयार करणेसंशयितांची यादी तयार करणे तसेच पोलीस नियंत्रण कक्ष आणि जिल्हा शल्य चिकीत्सक चंद्रपूर यांना दररोज 03 वाजता अहवाल सादर करण्याचे काम पाहात आहे.       
जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव उदभवल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही कृतीदल तयार करण्यात आले आहे. त्याद्वारा जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी यांचे निर्देशानुसार गावात भेटी देऊन प्रतिबंधात्मक कृती आराखडा तयार केला जात आहे.  तसेच यापुर्वी रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी आलेल्या व्यक्तींना भेटी देऊन समुपदेशन केल्या जात आहे.      
जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा भाग म्हणुन तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. योगेश कुंभेजकर यांचे मार्गदर्शनात  कन्टेन्मेंट प्लॉन तयार केलेला असुन डॉ. प्रतिक बोरकर व त्यांचे 15 सहकारी डॉक्टर तत्पर आहेत. 
                        भारत सरकार व महाराष्ट्र सरकारद्वारा निर्गमित सुचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे दृष्टीने तसेच दैनंदिन संशयीत पॅाझीटीव्ह रुग्ण यांचे मृत्युबाबत माहिती घेणे व त्याचे विश्लेषण करणे व प्रतिबंधात्मक कृती दल व जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी यांचेशी संपर्क साधुन आवश्यक सर्वेक्षण व कार्यवाही बाबत खात्री करणे यासाठी कमुनिकेशनइमरजंसीआणि सपोर्टींग स्कॉड तयार केलेले असुन त्याचे प्रमुख डॉ. प्रिती राजगोपाल या सक्षमपणे काम सांभाळीत आहे.
कोरोना कंट्रोल कक्षातील कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण व सनियंत्रण करणेसर्व पथक प्रमुखांशी समन्वय साधुन योग्य अंमलबजावणीबाबत खात्री करणेआपत्ती निवारण कायदा व साथरोग नियंत्रण कायदा व इतर संबंधित नियम व कायदयाची अंमलबजावणी करणेविविध विभागांशी संपर्क व समन्वय साधुन आवश्यकते नुसार साधन सामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध करणे या साठी ऍडमिनीस्ट्रेशन व कोऑर्डीनेशन सेल तयार करण्यात आले असुन सदर सेलमध्ये सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. संदिप गेडामसहाय्यक प्रशासन अधिकारी शालीक माऊलीकर व नंदकिशोर गोलर हे काम पाहात आहे.  तसेच कोरोना कंट्रोल रुम मध्ये आयटी सेल तयार केले गेले  याची जबाबदारी सुनिल चिकटे यांचेकडे आहे.
आयटी सेल अंतर्गत कोरोना संदर्भात  मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल कर्डिले व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी  निलेश काळे यांनी व्हीडीओ कॉन्फरंसीगद्वारे 827 ग्रामपंचातीतील सरपंचउपसरपंच व सचिव यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधुन ग्रामपंचायतीचे सॅनीटायझेशनप्रचार व प्रसिध्दी बाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. या प्रचार व प्रसिध्दीसाठी 5 हजार पोष्टर, 13 हजार प्रशिक्षण पुस्तीका, 5 हजार माहिती पुस्तीका, 60 हजार घडी पत्रीका व जिल्ह्यात 50 जाहीरात होर्डींगच्या माध्यमातून जिल्हयातील जनतेमध्ये कोविड 19 या आजारा संबंधात जाणीव जागृती केल्या जात आहे.  सदर प्रचार व प्रसिध्दीचे काम डॉ. गजानन राऊत करित आहे.
तर जिल्ह्यातील सर्व नगरपालीका क्षेत्रातील कन्टेनमेंट प्लॅनचे सनियंत्रणाचे काम जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुकडपवार हे पाहात आहे.  तसेच श्रीनिवास मुळावार हे नॅशनल पोर्टलवर कोविड बाबत दररोज माहिती संकलन व अद्यावत करण्याचे काम नियमितपणे करित आहे.  अशा प्रकारे कोविड 19 वर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस विभागासह जिल्हयातील सर्व यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. तसेच चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांचे सुध्दा योग्य सहकार्य मिळत आहे.  
                        संपुर्ण वैद्यकिय व्यवस्थापनसनियंत्रण व पर्यवेक्षणाची जबाबदारी इन्सीडंट मॉनिटरींग कमांडर म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत पार पाडित आहेत.
00000

No comments:

Post a Comment