Search This Blog

Wednesday 27 May 2020

शेती संबंधित दुकाने, आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू

शेती संबंधित दुकानेआस्थापना
सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू
चंद्रपूरदि. 27 मे: जिल्ह्यामध्ये 31 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. परंतुलॉकडाऊनमध्ये  काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली असून शेती संबंधित बी-बियाणे,खते,कीटकनाशके यांचेशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग,आस्थापना, दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सुधारित वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील व रविवारला सदर दुकाने पूर्णतः बंद राहतील.
जीवनावश्यक वस्तू व विक्रीवितरण इत्यादी आस्थापना, दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापनादुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील व रविवारला दुकाने पूर्णतः बंद राहतील. परंतुआपले दुकानआस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.
सदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 25 मे 2020 ते 31 मे 2020 या कालावधीकरिता लागू राहील.
00000

No comments:

Post a Comment