Search This Blog

Thursday 7 May 2020

पॉझिटिव्ह रुग्णावर इलाज करणाऱ्या डॉक्टरांचे स्वॅब तपासणीला


पॉझिटिव्ह रुग्णावर इलाज करणाऱ्या डॉक्टरांचे स्वॅब तपासणीला
संपर्कातील 84 व्यक्तींची नोंद रुग्णाची प्रकृती स्थिर
चंद्रपूर,दि. 7 मे : चंद्रपूर जिल्ह्यात आढळलेल्या एकमेव पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर असून नागपूर येथे त्याचा इलाज सुरू आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आत्तापर्यंत 84 व्यक्तिंची नोंद घेण्यात आली आहे. याशिवाय या रुग्णावर इलाज केलेल्या 8 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे स्वब देखील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
2 मे रोजी चंद्रपूर महानगरातील कृष्ण नगर येथे एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या परिसरात सर्व नागरिकांची तपासणी सुरू आहे. या परिसरातील 25 नागरिकांना संस्थात्मक कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. तर 59 नागरिकांना होम कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. या परिसरात तापाचे 5 रुग्ण आतापर्यंत आढळून आले असून पुढील तपासणी सुरू आहेअशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.
 रुग्णाच्या संपर्कातील 57 नमुन्यापैकी 38 निगेटिव्ह आले आहेत.19 अहवाल प्रतिक्षेत आहे.नागपूर येथे कोरोना शिवाय अन्य आजाराच्या वैद्यकीय इलाजासाठी चंद्रपूरच्या ज्या पॉझिटिव्ह रुग्णाला पाठविण्यात आले होतेत्यांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णाच्या पत्नीमुलगा व मुलगी यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून रुग्ण काम करीत असलेल्या अपार्टमेंटमधील सर्व रहिवाशांचा देखील अहवाल निगेटिव्ह आला आहे. तथापिया रुग्णाचा रहिवास असलेल्या परिसराची कडक नाकेबंदी करण्यात आली असून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. सदर रुग्णाची दुसऱ्यांदा स्वॅब तपासणी 14 आणि 15 मे रोजी होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातली एकूण परिस्थिती पुढील प्रमाणे आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये 185 स्वॅब नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी 155 निगेटिव्ह आहेत. 29 अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
00000

No comments:

Post a Comment