Search This Blog

Monday 11 May 2020

बिहारच्या दरभंगासाठी 261 मजुरांची जिल्हा प्रशासनाकडून रवानगी

बिहारच्या दरभंगासाठी 261 मजुरांची जिल्हा प्रशासनाकडून रवानगी
जिल्ह्यातील परप्रांतीयांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 11 मे : चंद्रपूर जिल्ह्यात विविध उद्योग समुहासाठी व आस्थापनावर काम करणाऱ्या बिहारमधील 261 मजुरांना त्यांच्या विनंतीवरून आज बिहारमधील दरभंगा स्टेशनसाठी रवाना करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून जवळपास 1 हजार मजुरांना त्यांच्या प्रदेशांमध्ये पाठविण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षामध्ये यासाठी उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार यांच्या मार्गदर्शनात एक विशेष कक्ष निर्माण करण्यात आला असून जिल्ह्यातील तहसीलदार ,नगरपालिकेचे मुख्याधिकारीमहानगरपालिकेचे आयुक्त कार्यालय यासाठी काम करीत आहे. जिल्हाभरातून नावे गोळा करणेमजुरांना एकत्रित करणेत्यांच्यासाठी खानपानवाहनांची व्यवस्था करणे व श्रमिक ट्रेनवर वर्धा नागपूर  येथे वेळेत पोहोचवणे असे जोखमीचे काम जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा करीत आहे.
 आतापर्यंत बिहारमधील दरभंगाबरवणी उत्तर प्रदेशातील लखनौ याठिकाणी मजुरांना पाठविण्यात आले आहे. आज दरभंगा येथे 261, दोन दिवसापूर्वी बरवणी येथे 187, लखनौ येथे 2 वेळा 307 आणि 187 मजुरांना रवाना करण्यात आले आहे. राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार यासर्व परप्रांतातील मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा देखील वापर करण्यात येत आहे.
औद्योगिक शहर असणाऱ्या बल्लारपुर येथून सर्वाधिक 132, पोंभुर्णा 2, गोंडपिंपरी 21, ब्रह्मपुरी 494, सावली 15, सिंदेवाही 2, गडचांदूर 9, कोरपना 14, मुल 60 नागरिकांना दरभंगा येथे पाठविण्यात आले आहे.
येत्या काही दिवसात आणखी काही श्रमीक रेल्वे गाड्या उत्तरेकडे धावणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या परप्रांतीय नागरिकांनी तहसील क्षेत्रात तहसीलदारांकडेनगरपालिका नगरपंचायतीच्या क्षेत्रात मुख्य अधिकाऱ्याकडे व चंद्रपूर महानगरांमध्ये आयुक्त कार्यालयामध्ये आपल्या नावाची नोंद करावी. असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये जम्मू कश्मीर लडाखबिहारउत्तर प्रदेश  या भागातील नागरिकांच्या देखील शोध घेतला जात असून जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनी देखील ज्या मजुरांना आपल्या प्रांतात परतण्याची इच्छा असेल त्यांच्या संदर्भात माहिती प्रशासनाला द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात अडचण असल्यास  जिल्हा नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक 07172-251597 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

00000

No comments:

Post a Comment