Search This Blog

Wednesday 20 May 2020

लॉकडाऊनच्या काळात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून 16 आस्थापनांवर कारवाई

लॉकडाऊनच्या काळात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून
16 आस्थापनांवर कारवाई
चंद्रपूर दि. 20 मे: लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन करीत असल्याने 152 आस्थापनाची तपासणी केली असता त्यापैकी 16 आस्थापना ह्या प्रतिबंधीत आदेशाचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.अशी माहिती  प्रसिध्दीपत्रकाद्वारे सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नितीन मोहिते यांनी दिली आहे.
देशात लॅाकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजेच दि. 21 मार्च 2020 ते 18 मे 2020 या कालावधीत एकूण 152 आस्थापनांची तपासणी केली असता त्यापैकी 16 आस्थापना ह्या प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्याकडून 41 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत .त्याची किंमत 20 लक्ष 59 हजार 509 एवढी आहे. सदर प्रतिबंधित अन्नपदार्थांची चोरटी वाहतूक करणारे 6 वाहनेही अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात संबंधित पोलीस स्टेशन येथे पुढील तपासासाठी प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे. अण्णा स्टेशन अहवाल प्राप्त होताच  दोषीवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये इतर अन्नपदार्थावरही कार्यवाही केलेली आहे. त्यापैकी मासे विक्रेत्यांवर एकूण 1 हजार 200 रुपये किमतीचे मासे नष्ट करण्यात आले तर राजधानी ट्रेड लींकमुंसिपल कारपोरेशन कॉम्प्लेक्स द्वारा बल्लारपूर ट्रेडिंग कंपनीचंद्रपूर यांचेकडून खजुराचा नमुना घेऊन उर्वरित 34 किलो साठा 13 हजार 872 रुपय किमतीचा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल.
दि.19 मे 2020 रोजी आनंद किराणा स्टोअर्समेहता कॉम्प्लेक्सतिलक मैदानचंद्रपूर यांच्या गोडाउनमध्ये ईगल,माझागोल्डनयुगतानसेनया कंपनीचे सुगंधीत तंबाखू तसेच पानपराग पान मसालासिग्नेचर पान मसालासुगंधित सुपारी ज्यांची किंमत बाजारभावाप्रमाणे अंदाजे 2 लक्ष रुपये इतका प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला आहे. या ठिकाणचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
जागरुक नागरिकांनी अशा सुगंधित सुपारीगुटखातत्सम पदार्थाबाबत साठावाहतूकविक्री होत असल्याची माहिती असल्यास सहाय्यक आयुक्तअन्न व औषध प्रशासनचंद्रपूर यांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहन  सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नितीन मोहिते यांनी केली आहे.
000000

No comments:

Post a Comment