Search This Blog

Saturday 16 May 2020

प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी गंभीरतेने लॉकडाऊन पाळण्याचे प्रशासनाचे निर्देश


प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी गंभीरतेने
लॉकडाऊन पाळण्याचे प्रशासनाचे निर्देश
चंद्रपूर,दि. 16 मे : जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी 1 रुग्ण व 13 मे रोजी 1 रूग्ण असे 2 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कृष्णनगर व बिनबा गेट परीसर प्रशासनाने सील केले असून हा परीसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी गंभीरतेने लॉकडाऊन पाळण्याचे प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील बिनबा वार्डसेंट फ्रान्सिस शाळेजवळविठ्ठल मंदिर प्रभाग क्र. 15 या भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने व त्यांचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरु नये. याकरीता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच शहरातील नागरीकांचे हित व सुरक्षेस्तव अधिकचे उपाययोजना तातडीने करणे आवश्यक असल्याने ॲक्शन प्लॅन फॉर क्लस्टर कंटेनमेंट निर्धारित करण्यात आलेला आहे.
भारत सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली यांनी नोवेल कोरोना व्हायरस डिसीज 2019 (कोविड-19) बाबत कंटेनमेंट प्लॅन निर्धारित केला असून त्यानुसार कोरोना विषाणुद्वारे बाधीत व्यक्ती/समुदायाच्या केंद्रबिंदू परिसरापर्यंत नागरीकांची हालचाल, फिरणे, संपर्क यावर निर्बंध घालून मज्जाव करणे बाबत निर्देशित केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनिमय 2005 च्या कलम 34 (सी) 34 (एम) आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) व  144 (3) अंतर्गत चंद्रपूर शहरातील इतर भागात कोरोना विषाणूचा संसर्ग इतर नागरिकांना होऊ नये. या दृष्टीने सदर भागाच्या सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत.
चंद्रपूर शहरातील इतर भागात कोरोना विषाणूचा  संसर्ग इतर नागरिकांना होऊ नये. या दृष्टीने खालील प्रमाणे ॲक्शन प्लॅन फॉर क्लस्टर कंटेनमेंट निर्धारित करण्यात येत आहे. तसेच खालील भागातील परिघीय परिक्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश दिलेला आहे.
ए) क्लस्टर कंटेनमेंट इनर पॉईंट मध्ये सेंट फ्रान्सिस शाळेजवळील परिसर व बालाजी वार्ड तसेच बी) इनर लाईन ऑफ कंट्रोल मध्ये बालाजी वार्डएकोरी वॉर्डबिनबा गेट यांचा समावेश आहे.तरसी) इनर कॉरडोनिंग (सेकंड कॉरडोनिंग- सेकंड लाईन ऑफ कंट्रोल) ‌ यामध्ये गांधी चौकगोल बाजारनगीना बाग यांचा समावेश आहे.
वरील नमूद क्षेत्रात कंटेनमेंट प्लॅन नुसार कार्यवाही करणेबाबत आदेशित करण्यात आले आहे.
सदर मनाई हुकूम आदेशाचे कालावधीत उपरोक्त सेंट फ्रान्सिस शाळेजवळील परिसरबालाजी वार्ड उत्तरेस ए) श्री. घोडेस्वार यांचे घर तेउत्तर-पश्चिम बी) किल्ल्याच्या तटबंदीजवळून डावीकडेसी) श्री. सदार यांचे घरासमोरून सेंट फ्रान्सिस हायस्कूल पर्यंतपश्चिम दक्षिण श्री. अरुण गेडाम यांचे घरासमोरूनदक्षिण डी) हनुमान मंदिर पर्यंतदक्षिण-पूर्व बंदिस्त सीमाउत्तर-पूर्व श्री.कमल साहू यांचे घरापर्यंत या क्षेत्रात पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही आवागमनास परवानगी असणार नाही. ही पूर्वपरवानगी आवश्यक सेवा पुरविणाऱ्या पास धारकांना सुद्धा लागू राहील.
सेंट फ्रान्सिस शाळेजवळील परिसरबालाजी वार्डएकोरी वार्डबिनबा गेटगांधी चौकगोल बाजारनगिनाबागक्षेत्रात शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेस्तव कर्तव्य करण्याची आवश्यक तातडीने वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधीवैद्यकीय सेवेशी संबधीत खाजगी डॉक्टरनर्समेडीकल स्टोअर्स दुकानदारपॅथॉलोजिस्टरुग्णवाहिका यांना मुभा राहील.
तसेच आयुक्तचंद्रपूर शहर महानगरपालीकाचंद्रपूर यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना, पासेस निर्गमित करण्यात याव्यात आणि सदर्हु परवाना, पासेस धारकांची यादी संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांना तात्काळ दयावी. सदर्हु परवाना, पासेस धारकांना आवश्यक सेवा पोलीस स्टेशन अधिकारी यांनी नेमूण दिलेल्या ठराविक वेळेत सकाळी 7 ते 2 या कालावधीत सेवा पुरविण्याची मुभा राहील. तसेच सदर्हु अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) चे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी आयुक्तचंद्रपूर शहर महानगरपालिकाचंद्रपूर यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांचेकडे राहणार आहे.
वरील आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 188 व इतर संबधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल.असे प्रशासनाचे स्पष्ट केले आहे.
000000

No comments:

Post a Comment