Search This Blog

Tuesday 19 May 2020

कृष्णनगर मधील पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा 14 दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह

कृष्णनगर मधील पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा
14 दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह
चंद्रपूर, दि.19 मे : चंद्रपूर जिल्ह्यातील 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या कृष्ण नगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाचा 16 मे रोजी घेतलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाचा पुन्हा 17 मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला आहे. हा अहवाल प्रतीक्षेत आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज मिळू शकतोअशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.
          2 मे रोजी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील कृष्ण नगर येथील सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या नागरिकाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण चंद्रपूर शहरातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण ठरला. त्यानंतर या रुग्णाला कोविड शिवाय अन्य आजाराच्या पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. 14 दिवसांच्या निगरानी कालावधीनंतर पुन्हा या रुग्णाचे 16 मे रोजी स्वॅब घेण्यात आले. हा नमुना निगेटिव्ह आला आहे. तसेच 17 मे रोजी आणखी 1 स्वॅब नमुना घेण्यात आला आहे. उद्यापर्यंत  याबाबतचा अहवाल प्रतीक्षेत आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास हा रुग्ण कोरोना मुक्त झालाअसे समजले जाऊ शकते. त्यामुळे आणखी एका अहवालाकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
34 पोलिसांचे स्वॅब तपासणीला:
दरम्यान, चेक पोस्टवर काम करणाऱ्या पोलीस दलातील जवानांचे स्वॅब घेण्याची मोहीम जिल्हा आरोग्य यंत्रणेने सुरू केली आहे. कालपर्यंत अति जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या 6 पोलीस जवानांचे स्वॅब घेण्यात आले होते. आज पुन्हा 34 जणांचे स्वॅब घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 40 पोलीस जवानांचे स्वॅब घेण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment