Search This Blog

Saturday 23 May 2020

मूर्तिकार व सार्वजनिक मंडळांनी पूर्वतयारी करतांना सावधानता बाळगावी

मूर्तिकार व सार्वजनिक मंडळांनी
पूर्वतयारी करतांना सावधानता बाळगावी
चंद्रपूर,दि.23 मे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाकडून धार्मिकसार्वजनिक कार्यक्रमावर असलेली बंदी कायम ठेवून लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यास लॉकडाऊनच्या काळात मूर्तिकाराकडून बनविण्यात आलेल्या मूर्ती विकल्या जाणार नाही. त्यामुळे मूर्तिकारांचे तसेच संबंधित मंडळाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या आर्थिक नुकसानीला प्रशासन जबाबदार राहणार नाही.त्यामुळे शासनाकडून पुढील आदेशापर्यंत मूर्ती तयार करू नये आणि मंडळाकडून देखील उत्सवाबाबत पूर्वतयारी करू नये,असे एका परिपत्रकात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केलेले आहे.
जिल्हयातील आगामी धार्मिक उत्सव जसे गणेशोत्सवनवरात्रोत्सव यासारखे उत्सवा करिता स्थानिक मूर्तिकाराकडून पूर्वतयारी म्हणून मातीच्या गणेश,शारदा देवी,दुर्गा देवी प्रतिकृती (मुर्ती) बनविल्या जातात.तसेच संबधीत मंडळाकडून सुध्दा उत्सवाची पूर्वतयारी करण्यात येते. परंतु,भविष्यात जर कोरोना विषाणुंचा प्रादुर्भावात वाढ होतच राहिली तर राज्य शासनाकडून धार्मिक,सार्वजनिक कार्यक्रमांकरिता असेलेली बंदी कायम ठेवुन लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आल्यास वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुर्तीकाराकडून बनविण्यात आलेल्या मूर्ती विकल्या जाणार नाही ज्यामुळे मूर्तिकारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते.
जिल्ह्यातील सर्व मूर्तिकार आणि सार्वजनिक मंडळ यांना वरीलप्रमाणे देण्यात आलेल्या आगाऊ सूचनांचे पालन न करता त्यांचेकडून मूर्ती बनविण्याचे काम सुरु ठेवल्यास व मंडळांनी पुर्वतयारी केल्यास आणि भविष्यात लॉकडाऊन चालु राहिल्यास होणाऱ्या आर्थीक नुकसानीकरिता प्रशासन जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
000000

No comments:

Post a Comment