Search This Blog

Tuesday, 19 May 2020

‘आनंदवन’कडून जिल्हा सहाय्यता निधीला दीड लाखाची मदत

आनंदवनकडून जिल्हा सहाय्यता निधीला दीड लाखाची मदत
चंद्रपूर, दि.19 मे : आपल्या विविध सामाजिक उपक्रमासाठी अग्रेसर असणाऱ्या  महारोगी सेवा समिती, आनंदवन कडून जिल्हा सहाय्यता निधीला मदत करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाच्या सर्व उपक्रमात आनंदवन सहभागी असल्याचे यावेळी आनंदवन मार्फत स्पष्ट करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन काटेकोर उपाययोजना करत असूनया उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्थाउद्योजकधार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत. जिल्हा सहाय्यता निधीस मदत करत आहेततसेच मदत करू इच्छित आहेत.
आज प्रामुख्याने महारोगी सेवा समितीआनंदवन वरोराच्या वतीने आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शीतल आमटे-करजगी व आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांच्या हस्ते रु.1 लक्ष 55 हजार 234 रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे.
कोव्हिड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.
जिल्ह्यातील उद्योजककंपन्यांचे प्रमुखस्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात. त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment