Search This Blog

Wednesday 27 May 2020

जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा साठा मुबलक : राहुल कर्डिले

जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा साठा मुबलक : राहुल कर्डिले
कृषी निविष्ठा खरेदी करतांना काळजी घेण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि.27 मे: खरीप हंगाम सन 2020 ला सुरुवात झाली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांना मूलभूत उच्च गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा (बी-बियाणे व रासायनिक खते) मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे  कारण नाही,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
कृषी निविष्ठा (बी-बियाणे व रासायनिक खते) खरेदीच्या वेळेस हि घ्यावी दक्षता :
फक्त कोविड-19 या रोगाच्या महासंक्रमण काळामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत शेती संबंधी सर्व कामे करावीत.
सर्व शेतकऱ्यांनी शक्यतो शेतकरी गटाच्या मार्फतीने बी- बियाणे व रासायनिक खताची खरेदी करावी खरेदी करतांना  कृषी विक्री केंद्रात  हॅन्ड सॅनीटायझरचा वापर करावा.
कृषी केंद्रात खरेदी करतांना शक्यतो एकमेकांपासून पाच फूट अंतरावर उभे राहावे. कृषी केंद्रात जाताना तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधणे आवश्यक आहे.कृषी विस्तार केंद्र विक्री केंद्रांच्या परिसरात गर्दी करू नये.
खरीप हंगामात विविध बियाणांच्या खरेदी वेळेस पुढील प्रमाणे दक्षता घ्यावी:
शेतकरी बांधवानी खरेदी करत असताना पिशवीला टॅग असल्याची खात्री करून घ्यावी. बियाणांची एक्स्पायरीची तारीख तपासून घ्यावी. विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती म्हणजे बिल घ्यावे. बिलावर बियाण्यांचे पीक आणि वान तसेच लॉट नंबरबियाणे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी.
सदोष बियाण्यांची तक्रार करता येण्याच्या दृष्टीने पेरतेवेळी पिशवीतून बियाणे टॅग असलेली बाजू सुरक्षित ठेवून खालील बाजूने फोडावी बियाण्यांचा थोडा नमुना पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये राखून ठेवाचा जेणेकरून तो तक्रार निवारण अधिकाऱ्यांस सादर करता येईल. बियाणे सदोष आढळल्यास तसेच एमआरपी पेक्षा अधिक रकमेची मागणी केली असता तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर 18002334000, दूरध्वनी क्रमांक 07172-271034 यावर तक्रार नोंद करावी.
00000

No comments:

Post a Comment