Search This Blog

Friday 15 May 2020

जिल्हा सहाय्यता निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन

जिल्हा सहाय्यता निधीमध्ये
मदत करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि.15 मे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहाय्यता निधी व  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदतीचा ओघ वाढत असून जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी तसेच कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून  जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या लढ्यासाठी मदत म्हणून अनेक दाते पुढे आले आहे.
संकटकाळी आपला वाटा असावा या उद्देशाने अनेकांनी  रोख रक्कम मदत म्हणुन जाहीर केली आहे. यावेळी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाविविध सेवाभावी संस्थासहकारी संस्था ,बचत गट तसेच दानशूर व्यक्तींनी जिल्हा सहाय्यता निधी तसेच मुख्यमंत्री सहायता  निधीमध्ये दान दिले आहे.
आज प्रामुख्याने जिल्हा सहायता निधीमध्ये अध्यक्षप्रेमज्योती नाभिक बहुउद्देशीय महिला मंडळ,चंद्रपूरच्या वतीने रु.10 हजार इतका निधी प्राप्त झाला. त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये चंद्रपूर जिल्हा सिमेंट कामगार संघमाणिकगड सिमेंट,गडचांदूरच्या वतीने 5 लक्ष रुपयाचा धनादेश सहायता निधीस देण्यात आला.
पंतप्रधान केअर निधीतही आले दान:
त्यासोबतच पंतप्रधान केअर निधीत काही रक्कम जमा झाली आहे. यात आतापर्यंत आमदार संजय धोटेपंजाबी सेवा समिती चंद्रपूरवी.एम.कोटपल्लीवारझुलूरवार ट्रान्सपोर्ट कंपनीजन शिक्षण संस्था चंद्रपुरसाई इंटरप्राईजेसचंद्रपूर-गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभा चंद्रपुरस्व.अॅड.जयरामराव देशमुख बहुउद्देशीय न्यास राजुरानानाजी बोढाले व जगन्नाथ बोढाले वरोरा या दानशूर व्यक्तीं व  संस्थांकडून आतापर्यंत 4 लक्ष 85 हजार इतका सहायता निधी प्राप्त झाला.
कलेक्टर चंद्रपूर कोविड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे.
कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.
जिल्ह्यातील उद्योजककंपन्यांचे प्रमुखस्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment