पॉझिटिव रुग्णाचा निवास असणाऱ्या
प्रतिबंधित क्षेत्रातील 8 हजार 540 नागरिकांची तपासणी
रूग्णाच्या संपर्कातील 84 पैकी 52 स्वॅब तपासणीला ;44 नमुने निगेटीव्ह
चंद्रपूर,दि. 8 मे : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत आढळलेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या 84 नागरिकांपैकी 52 लोकांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले होते.त्यातील 44 नमुने निगेटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.
आरोग्य यंत्रणेकडून आज काढण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर महानगरात कृष्णनगर परिसरातील कोविड रुग्णाला अन्य आजारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे भरती करण्यात आले असून या रुग्णाची आरोग्यविषयक स्थिती स्थिर आहे. या रुग्णाच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी या 3 व्यक्ती सध्या विलगीकरण कक्षात आहेत. त्यांचे नमुने यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत.
कृष्णनगर व लगतच्या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र 2 मे रोजी जाहीर करण्यात आले होते. (कंटेनमेंट झोन ) या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोरोना सोबतच अन्य आजाराची देखील तपासणी केली जात आहे. 2 मे रोजी या ठिकाणचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर 24 तासात संबंधित क्षेत्रांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. तथापि, या परिसरातील 3 मे पासून 8 मे पर्यंत सतत 6 दिवस 47 वैद्यकीय पथक तपासणी करीत असून आतापर्यंत दररोज 2 हजार 152 घरातील 8 हजार 540 नागरिकांची दररोज चौकशी व तपासणी केली जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये कोरोना संदर्भात 8 मे रोजी पर्यंत एकूण 192 स्वब नमुने घेण्यात आले आहे. आत्तापर्यंत 168 नमुने निगेटिव्ह आले आहेत. या पैकी 23 नमुने प्रतीक्षेत आहेत. तर केवळ 1 नमुना पॉझिटिव्ह आलेला आहे.
जिल्ह्यामध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 115 तालुकास्तरावर 63 असे एकूण 178 नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) करण्यात आले आहे.
याशिवाय परदेशात जाऊन आलेले व महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आपल्या गावाला पोहोचलेल्या 48 हजार 144 नागरिकांना गृह अलगीकरण (होम कॉरेन्टाइन ) करण्यात आले आहे.यामध्ये ग्रामीण भागातील 40 हजार 427, शहरी भागातील 4 हजार 583 ,महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 134 नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये गृह अलगीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींची संख्या 36 हजार 321 आहे. सध्या गृह अलगीकरण सुरू असणाऱ्या व्यक्तींची संख्या 11 हजार 823 आहे. या सर्वांनी शासनाने वेळोवेळी निर्देशित केल्याप्रमाणे संस्थात्मक अलगीकरण व गृह अलगीकरण्याचे निर्देश काटेकोरपणे पाळावे व आपले आणि आपल्या कुटुंबाचे, समाजाचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
No comments:
Post a Comment