Search This Blog

Friday 15 May 2020

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही : डॉ. कुणाल खेमनार

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा
तुटवडा नाही : डॉ. कुणाल खेमनार
तुटवड्याची अफवा पसरविणाऱ्यावर होणार कारवाई
चंद्रपूर,दि.15 मे: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये मिठाचा तुटवडा असल्याची अफवा पसरली आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही. मोठ्या प्रमाणात मिठ साठा उपलब्ध आहे,अशी माहितीजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.
सावलीसिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये काही लोकांकडून अफवा पसरवण्यात आली परंतु, जिल्ह्यामध्ये मुबलक स्वरूपात मीठाचा साठा उपलब्ध आहे. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत किंवा जास्तीचे पैसे देऊन मीठ खरेदी करू नये.अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी मीठ जास्तीची खरेदी केल्यास जिल्हयात मीठ संपण्याच्या अडचणीस सामोरे जावे लागेल. मात्र जिल्ह्यात मीठाचा मुबलक साठा असून अकारण मीठ खरेदी करून साठा करू नयेअसे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
दुकानदार यांनीही याबाबत आवश्यक काळजी घेऊन ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊन मीठ विक्री करू नये. तसेच याबाबत येणाऱ्या ग्राहकांना ही खरी माहिती द्यावीअसे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.अचानक वाढलेली मागणी व बाजारपेठेतील मिठाची झालेली कृत्रिम टंचाई याबाबत प्रशासनाने दखल घेऊन नागरिकांना आवाहन केले आहे. प्रशासनाकडून दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. कोणतीही अफवा असल्याचे लक्षात आल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवा आणि त्याबाबत खात्री करून घ्या.
चंद्रपुर जिल्हयात उपविभाग निहाय विशेष तपासणी पथक स्थापन करण्यात आलेले असुन त्यांचे मार्फत जीवनावश्यक वस्तु विक्रेत्याची तपासणी करण्यात येत असुन लॉकडाऊनचे काळात आजपर्यंत या पथकांनी 446 तपासण्या केल्या असुन 13 दुकानांविरुध्द कारवाई प्रस्तावीत करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील नागरीकांना जीवनावश्यक वस्तुबाबत काही तक्रारी असल्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या   1800224950 व 1967 तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालय  9892830230 तर सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र कार्यालय 9423122027 या  दुरध्वनी क्रमांकावर तक्रारी करु शकता.
000000

No comments:

Post a Comment