Search This Blog

Saturday 16 May 2020

बांधकाम कामगारांचे अर्थसहाय्य थेट बँक खात्यात

बांधकाम कामगारांचे अर्थसहाय्य थेट बँक खात्यात
2 हजार रुपये अर्थसहाय्य होणार जमा
चंद्रपूरदि.16 मे: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात माहे एप्रिल 2019 ते मार्च -2020 या कालावधीत नोंदीत व नूतणीकरण केलेले नोंदणीकृत सक्रीय जिवित बांधकाम कामगारांना कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव कालावधीत मंडळामार्फत रुपये 2 हजार इतके अर्थसहाय थेट (डीबीटी) कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकात सहायक कामगार आयुक्त यांनी दिली आहे.
कोविड-19 या रोगाचा प्रादूर्भाव थांबविण्याकरीता केंद्र शासनातर्फे दि. 23 मार्च पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले असल्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ,चंद्रपूर या कार्यालयामध्ये नविन बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतणीकरण अशा स्वरुपाचे काम बंद करण्यात आलेले आहे.
सदर अर्थसहाय्य करीता कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यालयात सादर करण्याचे अथवा त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाहीयाची चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी,असे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे जनहितार्थ प्रसिध्द करण्यात येत आहे.
00000

No comments:

Post a Comment