Search This Blog

Sunday 17 May 2020

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढवा :ना.प्राजक्त तनपुरे

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी
रोग प्रतिकार शक्ती वाढवा :ना.प्राजक्त तनपुरे
चंद्रपूर, दि. 17 मे:  संपूर्ण देशात व महाराष्ट्रात कोविड-19 या साथरोगाचा प्रादुर्भाव झाला असून दिवसांगणिक रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता जिल्ह्यात आजारापासून संरक्षण व  दक्षता  घेण्याकरिता  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूरद्वारे मोठ्या प्रमाणात उपाय योजना करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून नियंत्रण कक्षाच्या मार्फतीने चंद्रपूर शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात येत असून त्यांना आजारापासून बचाव व घ्यावयाच्या काळजीबाबत आवश्यक सूचना दिल्या जात आहे. तसेच आजारी व्यक्तीबाबत प्राप्त संदेश व माहितीच्या आधारे आजारावर वेळीच नियंत्रण मिळविण्याकरिता आरोग्य विभागजिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत तात्काळ उपाय योजना केल्या जात आहे.
प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व निरोगी जीवन जगण्याकरिता जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरेनगर विकास, ऊर्जा, आपत्ती निवारणमदत व पुनर्वसन  यांच्या हस्ते नियोजन भवन येथे आयुष पद्धतीने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता विविध उपाययोजनाप्रचार साहित्य व माहिती पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डीजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एन.मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण जग कोरोना या आजाराशी झुंज देत असून सदर लढाई दीर्घकाळ लढावी लागणार असल्याचे व याकरिता आयुष्य विभागांनी सुचविलेली जीवन पद्धतीतील बदलघरीच घेता येणारी औषधे व रोग प्रतिकार शक्ती वाढवून आपण कोविड-19 सारख्या आजारावर विजय मिळवू शकतो. असे आवाहन आरोग्य विभाग (आयुष) जिल्हा परिषद चंद्रपूरद्वारे करण्यात आले आहे. 
तर सदर माहितीपुस्तिका जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत यांच्या मार्गदर्शनात तयार झाली असून डॉ. अकील कुरेशीवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक बारापात्रेडॉ.राजेश कामडे व डॉ.मोहसीन सय्यद यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
00000

No comments:

Post a Comment