Search This Blog

Thursday 21 May 2020

पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजनेची आढावा बैठक

पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली
रोजगार हमी योजनेची आढावा बैठक
चंद्रपूर दि.21 मे : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक तालुका व ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेली कामेसाप्ताहिक मजूर उपस्थितीची प्रगती पथावरील कामेवृक्ष लागवड योजनेतंर्गत येणारी कामेगाळ काढणेजलसंधारणाची कामे, रोप निर्मिती  आदी कामाचा  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विविध विभागाकडून आढावा घेतला.
नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीला खासदार बाळू धानोरकरआमदार किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी  डॉ.कुणाल खेमनारजि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटीलविभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे उपस्थित होते.
मनरेगातून बांबूची लागवड करावी जेणेकरून शेतकऱ्यांनामहिलांना व बेरोजगारांना आर्थिक लाभ मिळू शकेलत्यांचे जीवनमान उंचावेल यासोबतच वृक्ष लागवड योजनेअंतर्गत कृषी, व वनविभागसामाजिक वनीकरण विभागाला रोपवाटिकाबांबू लागवडीसाठी नियोजन करून जास्तीत जास्त मजुरांना काम मिळेल यासाठी विभागातील अधिकाऱ्यांना सूचनाही त्यांनी दिल्या.
00000  

No comments:

Post a Comment