Search This Blog

Sunday 24 May 2020

जिल्हा प्रशासनासोबत कोविड विरुद्धच्या युद्धात सहभागी व्हा

जिल्हा प्रशासनासोबत कोविड विरुद्धच्या
युद्धात सहभागी व्हा
जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
चंद्रपूरदि. 24 मे: कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना राबविल्या जात आहे. आता जिल्हा प्रशासना सोबत कोरोना विरुद्धच्या युद्धात जिल्ह्यातील 18 वर्षावरील नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
यांना होता येणार सहभागी:
जिल्ह्यातील डॉक्टरप्रशिक्षित पॅरामेडिकपॅलीएटीव्ह केअरहॉस्पिटल मॅनेजमेंट एक्सपर्टसॉफ्टवेअर डेव्हलपरयोगा ट्रेनरडिजिटल कंटेंट क्रियेटर (ऍनिमेशन,मूवी मेकिंग)फिटनेस ट्रेनरटेली कॉलिंग प्रोफेशनलइव्हेंट मॅनेजरसप्लाय चेनलॉजिस्टिक मॅनेजमेंटवेअर हाऊसिंगसायकॅट्रिक कौन्सिलिंग एक्सपर्टजनरल स्वयंसेवकस्वयंपाकी इत्यादींना कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी सहभागी होऊ शकता.तसेच,मास्कसॅनिटायजर आणि इतर पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट तयार करण्यासाठी सुद्धा स्वयंसेवकांची आवश्यकता आहे.
सहभागी होण्यासाठी संपर्क करा:
स्वयंसेवकांनी सहभागी होण्यासाठी chanda.nic.in या संकेतस्थळाला भेट देवून होम पेजवरील इन्डीवीजवल वालेन्टीअर या नावाचे चित्रावरील जॉइन नाऊ यावर क्लिक करा त्यानंतर गुगल फॉर्म उघडल्या जाईल. या गुगल फॉर्म वर सविस्तर माहीती भरा आणि फॉर्म सबमिट करा.या संबंधित काही अडचण असल्यास  जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या 07172-251597,272480 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता.

00000

No comments:

Post a Comment