Search This Blog

Tuesday 12 May 2020

अन्नधान्य वितरणाची 'साखळी' मजबूत एप्रिलमध्ये जवळपास 100 टक्के वाटप

अन्नधान्य वितरणाची 'साखळीमजबूत
एप्रिलमध्ये जवळपास 100 टक्के वाटप
राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची चेन अर्थात साखळी तोडण्याची एकीकडे प्रशासनाची धडपड आहे. मात्र सोबतच अन्नधान्य वितरणाची साखळी अतिशय मजबूत व्हावी व कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रशासनाची धडपड आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून अन्नधान्याची साखळी कुठेही तुटू नये यासाठी केलेल्या प्रयत्नाला एप्रिल महिन्याच्या आकडेवारीवरून यश आल्याचे दिसून येते. एप्रिल महिन्यात जवळपास 100 टक्के वितरण योग्य प्रमाणात झाल्याचे पुढे आले आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था अतिशय मजबुतीने चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पुरवठा कार्यालयतहसील कार्यालयस्वस्त धान्य दुकान यांच्या माध्यमातून जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत व प्रधानमंत्री गरीब कल्याणचे योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांना गहूतांदूळसाखर यांचे  वाटप सुरू असून एप्रिल महिन्याचे वाटप पूर्ण झालेले आहे.
 जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात तब्बल 97771.6 क्विंटल धान्य वाटप झाले असून त्याची टक्केवारी 99.23 आहे. यामध्ये अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांनी 48 हजार 388 इतके क्विंटल धान्याची उचल केलेली आहे. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांनी 49 हजार 383 क्विंटल धान्याची उचल केलेली आहे. तर एपीएल अर्थात केशरी शिधापत्रिकाधारकांनी 2845.95 इतक्या क्विंटल  धान्याची उचल केली आहे.
तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना 74689.14 इतके क्विंटल प्रतीव्यक्ती 5 किलो प्रमाणे तांदूळ मोफत वाटप करण्यात आले आहे.
तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील 9 हजार 631 इतक्या शिधापत्रिकाधारकांना एका राज्यातील मजुरांना जिथे असेल तिथे अन्नधान्य देण्याच्या योजना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे.
अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना गहू 20 हजार 199 क्विंटलतांदूळ 26 हजार 923 क्विंटलतर साखर 1 हजार 266 क्विंटलचे वाटप झालेले आहे. तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू 29 हजार 631 क्विंटलतांदूळ 19 हजार 752 क्विंटलचे वाटप झालेले आहे. तर केशरी शिधापत्रिकाधारकांना गहू 1 हजार 776 क्विंटलतांदूळ 1 हजार 77 क्विंटलचे वाटप झालेले आहे.
जिल्ह्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका 1 लाख 37 हजार 482असून  5 लाख 20 हजार 464 इतके लाभार्थी आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका 2 लाख 56 हजार 174 असून 10 लाख 29 हजार 919 इतके लाभार्थी आहे. केशरी शिधापत्रिकांची 48 हजार 821 संख्या असून 1 लाख 56 हजार 556 इतके लाभार्थी आहे.
अंत्योदय अन्न योजने अंतर्गत प्रति कार्ड 2 रुपये प्रति किलो दराने गहू 15 किलो, 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ 20 किलो तर 20 रुपये प्रति किलो दराने साखर 1 किलो मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 2 रुपये प्रति किलो दराने गहू 3 किलो, 3 रुपये प्रति किलो दराने  तांदूळ 2 किलो मिळणार आहे.
केशरी कार्ड धारकांना माहे मे महिन्यात प्रति मानसी 3 किलो गहु रुपये 8 प्रति किलो व 2 किलो तांदुळ रुपये 12  प्रमाणे त्यांचे कार्ड ज्या दुकानात नोंदविले आहे त्याच दुकानातुन मिळत आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यांमध्ये एकूण 1 हजार 533 स्वस्त धान्य दुकानांद्वारे धान्य वाटप सुरळीत होत आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या माध्यमातून या सर्व धान्य वाटपावर लक्ष ठेवण्यात येते.
धान्यवाटपासाठी खबरदारी :
धान्य वाटप करताना विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. स्वस्त धान्य दुकान  दिलेल्या वेळेतच सकाळी 8 दुपारी 2 या वेळेत उघडे असणार आहेत. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य घेण्यात येणाऱ्या प्रत्येक लाभार्थी त्याकरिता हात धुण्याकरिता हँडवॉश किंवा साबण व सॅनीटायझर उपलब्ध केलेले आहेत तसेच सामाजिक अंतर ठेवून मास्कचा वापर करून धान्य वितरण होत आहे.
जिल्ह्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणच्या अडचणीसाठी व धान्य वितरणाबाबत चौकशी करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुद्धा जारी केलेले आहे.यानुसार धान्य वितरणा संबंधित माहिती व अडचणींचे निराकरण केल्या जात आहे.
जिल्ह्यामध्ये अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी काही कारवाई देखील कारणीभूत ठरलेले आहेत. यामध्ये जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकान तपासणी केलेली संख्या 148 असून  13 स्वस्त धान्य दुकाने निलंबित केलेली आहे. तर 31 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला असून 3 व्यक्तींवर गुन्हे दाखल केलेले आहे. अन्नधान्याची कृत्रीम टंचाई निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर तसेच धान्याची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर पुरवठा विभाग, वैधमापन शास्त्र विभाग व पोलिस यांच्या संयुक्तपने कारवाई करण्यात येत आहे.
77 हजार थाळींचे शिवभोजन:
जिल्ह्यात 16 शिवभोजन केंद्र असून एप्रिल महिन्यामध्ये 76 हजार 697 इतक्या थाळींचे वितरण झालेले आहे. शिवभोजनामुळे गरीबगरजू, विमनस्क व विस्थापितांची भूक भागविल्या जात आहे. शिवभोजन थाळी ही लॉकडाऊनच्या काळामध्ये फक्त 5 रुपयात मिळत असून शिवभोजन थाळी अडचणीत असलेल्या नागरिकांना आधार देण्याचे काम करत आहे. अशा नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. शिवभोजन थाळी पॅकेटच्या माध्यमातून वितरित करण्यात  येत आहे. जेणेकरून सामाजिक अंतर राखण्यास मदत होत  आहे.
सर्वांना अन्नधान्य वेळेत व सुरळीत मिळावे यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारीसहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारीअन्नधान्य वितरण अधिकारीकर्मचारी, अव्वल कारकून पासून तर गोदामपाल तसेच तहसील कार्यालयातील  निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षकपुरवठा लिपिकशिपाई पासून तर धान्य वितरण करणारे स्वस्त धान्य दुकानदार यांची या काळातील कामगिरी मोलाची आहे.
जिल्ह्यामध्ये अन्नधान्याची कोणतीच टंचाई नाही. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी महिन्याचे धान्य  उचलावे तसेच सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांचे दुकानात नोंदलेल्या कार्ड धारकांचे प्रमाणातच धान्य वितरण केल्या जाते त्यामुळे रेशन कार्ड नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने दुकानदारांना धान्याची मागणी करु नये असे आवाहन देखील जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
जिल्हा माहिती कार्यालय,चंद्रपूर
000000

No comments:

Post a Comment