Search This Blog

Tuesday 12 May 2020

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात आत्तापर्यंत 55 हजार नागरिक होम कॉरेन्टाइन

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात आत्तापर्यंत
55 हजार नागरिक होम कॉरेन्टाइन
पॉझिटीव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर संपर्कातील 60 व्यक्ती निगेटिव्ह
चंद्रपूर, दि. 12 मे : जिल्ह्यामध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू झाल्यापासून गेल्या 52 दिवसात आतापर्यंत एकूण 55 हजार 736 नागरिकांना होम कॉरेन्टाइन अर्थात गृह अलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या संपर्कातील आत्तापर्यंत 62 नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून 60 नमुने निगेटिव्ह आहे. दोन नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यात कृष्ण नगर परिसरातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्याच्या संपर्कातील 95 लोकांची नोंद घेण्यात आली आहे. आतापर्यंत त्याच्या संपर्कातील 62 लोकांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 60 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह निघाले आहे. दोन नागरिकांचे नमुने प्रतीक्षेत आहे. संपर्कातील 95 नागरिकांपैकी 66 नागरिकांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे. तर 29 नागरिकांना संस्थात्मक कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. कृष्ण नगर परिसरात आज सलग दहाव्या दिवशी 47 आरोग्य पथकाने या परिसरातील 2 हजार 152 घरांची आरोग्य पाहणी केली. श्वसनाचा आजार किंवा ताप असणाऱ्या रुग्णांची देखील विशेष दखल घेतली जात आहे.या परिसरात 12 मे रोजी पर्यत कोणत्याही संशयित रुग्णांची नोंद नाही.
कोरोना काळात आपला जिल्हा कोरोना मुक्त ठेवायचा असल्यास शारीरिक अंतरमास्कचा वापर आणि घरीच राहणे हाच उपचार असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत आज जाहीर झालेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये गेल्या 52 दिवसात 55 हजार 736 नागरिकांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या ही ग्रामीण भागात बाहेरून आलेल्या नागरिकांची आहे.आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 47 हजार 510 लोकांना गृहअलगीकरण करण्यात आले आहे. नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रांमध्ये 4 हजार 875 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 3 हजार 351 नागरिकांचे गृह अलगीकरण करण्यात आले आहे.
सध्या जिल्ह्यातील शहरी,ग्रामीण व मनपा क्षेत्रांमध्ये एकूण 16 हजार 193 नागरिक गृह अलगीकरणात आहे. तर या सर्व ठिकाणी एकत्रित 39 हजार 543 नागरिकांचे 14 दिवसांचे गृह अलगीकरण पूर्ण झाले आहे.
दरम्यान, संस्थात्मक अलगीकरणाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 110 तालुकास्तरावर 190 असे एकूण 300 नागरिक सध्या संस्थात्मक अलगीकरणात आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 267 लोकांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी एकच स्वॅब नमुना पॉझिटिव्ह, 213 नमुने निगेटिव आहे. 53 जणांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.

000000

No comments:

Post a Comment