Search This Blog

Thursday 14 May 2020

जिल्हा कोरोना मुक्त होईल अशा प्रकारचे नियोजन करा : ना. प्राजक्त तनपुरे


जिल्हा कोरोना मुक्त होईल अशा प्रकारचे
नियोजन करा : ना. प्राजक्त तनपुरे
जिल्हयातील कोरोना उपायोजनाबाबत आढावा बैठक
चंद्रपूर, दि. 14 मे : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुदैवाने कोरोना आजाराचा अधिक प्रादुर्भाव नाही. त्या दृष्टीने आपले नियोजनही उत्तम आहे.मात्र सध्या मोठ्या प्रमाणात मजूरकामगार, विद्यार्थी यांचे रेड झोन मधून अवागमन होत आहे. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी. जिल्हा कोरोना मुक्त राहील अशा प्रकारचे आपले नियोजन असावेअशी सूचना राज्याचे नगर विकासऊर्जाउच्च व तंत्रशिक्षणआपत्ती व्यवस्थापनआदिवासी विकासमदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज येथे केली.
चंद्रपूर येथे जिल्हा नियोजन भवनात प्रमुख अधिकाऱ्यांची आज त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला शारीरिक अंतर राखून विभाग प्रमुखांना आपल्या कामकाजाचा आढावा देण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. यावेळी बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेमहानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहितेनिवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे तसेच आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. कोरोना प्रादुर्भाव सुरुवात झाल्यापासून प्रत्येक बाहेरून आलेल्या नागरिकांचे गृह अलगीकरण करणे, त्यांची नोंद घेणेतसेच आरोग्य पथक यांच्यामार्फत वारंवार प्रत्येक घराची चौकशी करणेतसेच आधुनिक संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून प्रशासन व सामान्य नागरिक यांच्यामध्ये समन्वय ठेवल्यामुळे मोठ्याप्रमाणात तपासणी व रुग्णांची माहिती गोळा करता आली. त्यामुळे नेमकेपणाने जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविता आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरणही करण्यात आले.
 सादरीकरणानंतर बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी राज्याचे मदत पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन व इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे आपल्याला निधीची कमतरता जाणार नाही. त्यांच्या नेतृत्वात अतिशय उत्तम असे नियोजन जिल्ह्यांमध्ये करण्यात आले असून आगामी काळात आणखी रुग्ण वाढणार नाही यासाठी काळजी घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच वेगवेगळ्या संपर्क व्यवस्था मार्फत सुरू असलेल्या उपाययोजना बद्दल सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
तत्पुर्वी,त्यांनी राज्यातील सर्वात मोठ्या औष्णिक वीज केंद्राला भेट दिली. तसेच हा प्रकल्प लॉकडाऊनच्या काळातही पूर्ण क्षमतेने सुरू राहीलअशी काळजी घेण्याची सूचना केली. यावेळी उपस्थित चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राचे श्री. घुगे, श्री. जयस्वाल, श्री. वैद्य, श्री. भंडारकर आदी अधिकारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment