Search This Blog

Friday 15 May 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील 317 नमुन्यांपैकी 286 नमुने निगेटीव्ह

चंद्रपूर जिल्ह्यातील 317 नमुन्यांपैकी 286 नमुने निगेटीव्ह
दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर 29 नमुने प्रतीक्षेत
चंद्रपूर, दि. 15 मे : 2 मे व 13 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यात आढळलेल्या दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 317 नमुने घेण्यात आले असून त्यापैकी 280 नमुने निगेटिव्ह आहेत. 29 नमुने अद्याप प्रतीक्षेत असून कृष्ण नगर व बिनबा या दोन्ही संरक्षित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे.
        आरोग्य विभागाने आज जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये दिनांक 2 मे रोजी आढळलेला कृष्ण नगर येथील पॉझिटिव्ह रुग्ण सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यामध्ये बिनबा गेटजवळ 13 मे रोजी अन्य एक महिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळली होती. या महिलेच्या कुटुंबातील 5 सदस्यांचे नमुने घेण्यात आले होते. या पाचही नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह आहे.
यवतमाळ येथून हे रुग्ण आल्यामुळे यवतमाळ येथील प्रशासनाला अति जोखमीच्या 2 रुग्णांची माहिती कळविण्यात आली आहे. बिनबा गेट परिसरात महानगरपालिकेच्या 4 आरोग्य पथकामार्फत एकूण 190 घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या परिसरातील 728 नागरिकांच्या प्रकृतीवर प्रशासन लक्ष ठेवून असून त्यांची दररोज वैद्यकीय तपासणी केली जात आहे. जिल्ह्यांमध्ये सध्या 572 नागरिक संस्थात्मक अलगीकरण पक्षांमध्ये आहे. तर जिल्ह्यात गृह अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 59 हजार 552 झाली आहे. यापैकी 40 हजार 284 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. तर सध्या एकूण 20 हजार 268 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
000000

No comments:

Post a Comment