Search This Blog

Friday, 15 May 2020

चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच : जिल्हाधिकारी



चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील
व्यावसायिक आस्थापना सुरूच: जिल्हाधिकारी
Ø  जीवनावश्यक दुकाने सकाळी 7 ते 5 सुरू
Ø  अन्य दुकाने सकाळी 10 ते 5 सुरू राहतील
चंद्रपूर,दि.15 मे: फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) चे कलम 144 चे अन्वये जिल्ह्यात दिनांक 11 मे 2020 पासून ते 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन मध्ये सुरू असणार्‍या आस्थापना बाबत निर्गमित करण्यात आलेले आहे.चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच राहतील. असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिला आहे.
या वेळेत सुरू असनार आस्थापना,दुकाने :
जीवनावश्यक खाद्यपदार्थकिराणादूधदुग्धजन्य पदार्थ  विक्री व वाहतुकब्रेडफळेभाजीपालाअंडीमांसमासेबेकरीपशुखाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील.परंतु,दुकान,आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.
जीवनावश्यक वस्तू विक्री व वितरण इत्यादी आस्थापना,दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना, दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत सुरू राहतील व रविवारला सदर दुकाने पूर्णत: बंद राहतील. परंतुदुकानआस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणते प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.
सदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 14 मे ते 17 मे या कालावधीकरिता लागू राहील. परंतुचंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपुरचे क्षेत्राकरिता लागू राहणार नाही.
00000

No comments:

Post a Comment