Search This Blog

Wednesday 27 May 2020

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-1 मध्ये मुदतीत सादर करावी : भैय्याजी येरमे

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना
ईआर-1 मध्ये मुदतीत सादर करावी: भैय्याजी येरमे
चंद्रपूर,दि.27 मे:चंद्रपूर जिल्ह्यातील आस्थापना या कार्यालयात येऊन स्वतःची प्रोफाईल अद्यावत करून ईआर-1 भरून घेत आहे.परंतुअजूनही बऱ्याच आस्थापना येणे बाकी आहे.तेव्हा पुनश्च याद्वारे कळविण्यात येते कीज्या आस्थापनांनी अजून पर्यंत प्रोफाईल अद्यावत केलेले नसून ईआर-1 सुद्धा भरले नाही किंवा याबाबत त्यांनी काही कळलेले नाही.त्यांनी या कार्यालयात येऊन सदर प्रक्रिया समजावून घ्यावी व कार्यवाही पूर्ण करावी व कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापणांनी  सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय निमशासकीय,तसेच कलम 5(2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापणांना त्यांच्या आस्थापणेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष,स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीसविषयांकित कायद्यातील तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.
यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास chandrapurrojgar@gmail.com व asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in  या ई-मेल आयडीवर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईलअसेही त्यांनी सुचित केले आहे.
00000

No comments:

Post a Comment