जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्य डॉ.कुणाल खेमणार यांचे आवाहन
चंद्रपूर, दि 8 मे : चंद्रपूरच नव्हे, देशच नव्हे,तर संपूर्ण जगात कोविड-19 या विषारी विषाणूचे थैमान माजलेले आहे. या विषाणूच्या महाप्रकोपाच्या विरोधात डॉक्टर्स,नर्सेस,पोलीस कर्मचारी,आरोग्यसेवक प्रशासकिय अधिकारी,जनप्रतिनिधी व समाजातील सर्व स्तरातील घटक लढा देत आहे.हा लढा आपन जिंकूच. त्यासाठी रेडक्रॉसचे योध्दे व्हा, असे आवाहन जागतिक रेडक्रॉस दिनाचे निमित्याने आयोजीत झुम अप्लिकेशनच्या माध्यमातून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सभेत इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.
जागतिक युद्धात कोरोना योद्धा म्हणून सक्रितेने कार्य करण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांना त्यांनी आवाहन केले.
युद्ध असो किंवा नसो. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी मानवतेच्या दृष्टिकोनातून इंडियन रेड क्रॉस संघटना ही धाऊन येते. देश,धर्म,भाषा,प्रांत या साऱ्या भिंती ओलांडून जनसेवेचे व्रत घेतलेल्या या संघटनेचे जनक म्हणून स्वित्झरलँडचे हेनरी डयूनॉट यांचा जन्मदिवस हा जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या जागतिक रेड क्रॉस दिनाच्या शुभेच्या देतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड़ यांनी आपले मत व्यक्त केले. या झूम अप्लिकेशनद्वारा आखण्यात आलेल्या अनोख्या कार्यक्रमाचे संचालन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केले. तर सी.ए शादाब चिनी यांनी आभार मानले. या झूम मीटिंगच्या सभेत सी.ए रमेश मामीड़वार, ईब्राहिम जव्हेरी, बाबा कारेकर, डॉ.संजय घाटे, डॉ.कल्पना गुलवाडे, डॉ.मनीषा घाटे, डॉ.अनंता हज़ारे यांच्या सह बहुसंख्य इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य हजर होते. कार्यक्रमाच्या यशश्वीते साठी सुभाष मुरस्कर,आरिफ खान, रमेश सोनटक्के यांनी परीश्रम घेतले.
000000
No comments:
Post a Comment