Search This Blog

Saturday 16 May 2020

पालकमंत्री यांच्या सूचनेनंतर 16 कामगारांची स्वगावी रवानगी

पालकमंत्री यांच्या सूचनेनंतर
16 कामगारांची स्वगावी रवानगी
चंद्रपूरदि. 16 मे: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन असल्याकारणाने अनेक कामगार इतर राज्यात,जिल्ह्यात अडकलेले आहेत.अशाच जिल्ह्यातील अडकलेल्या 16 कामगारांना‌ राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत पुनर्वसनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनंतर जिल्ह्यातील स्वगावी पोहोचविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील  कामगार कामानिमित्त बाहेर राज्यात,जिल्ह्यात मोठ्या संख्येने जात असतात. परंतुलॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वच बंद असल्या कारणाने जिल्ह्यातील अनेक कामगार आता आपल्या जिल्ह्यात स्वगावी परत येत आहे.
काल रात्री उशिरा नागपूर येथून 16 कामगार चंद्रपूर येथील बस स्थानकावर आले.पुणे येथील एका कंपनीत हे कामगार काम करीत होते. या कामगारांना पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेवरून चंद्रपूर  बसस्थानकावरून कामगारांना सिंदेवाहीनागभीड येथे जाण्यासाठी बसची व्यवस्था करून त्यांना स्वगावी पोहचविण्यात आले.कामगारांनी बस उपलब्ध झाल्यामुळे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी सहसमन्वयक पालकमंत्री यांचे कार्यालय चंद्रपूर उमेश आडेनायब तहसीलदार अजय भास्करवारपालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप गद्देवारसहाय्यक वाहतूक निरीक्षक शेखर उईके हे प्रामुख्याने उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment