अफवा पसरविणाऱ्या वेब न्युज पोर्टलवर कायदेशिर कारवाई
सर्वच माध्यमांनी जबाबदारीने वृत्तांकन करण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि.8 मे: जिल्हयात दिनांक 6 मे रोजी रात्रीच्या दरम्यान माणिकगड (गडचांदुर) येथे नांदेड येथील आलेल्या 3 नागरीकांना संशयावरुन जिल्हा प्रशासन व पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले होते. पोलीस विभाग व कोविड 19 नियंत्रण कक्षाच्या मदतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीसांसोबत संपर्क केला असता चंद्रपुर येथील ताब्यात घेतलेले 3 इसमाचे नावे ही नांदेड येथुन पसार झालेल्या इसमांसोबत मिळते जुळते नसल्याची माहीती मिळाली. पुढील खबरदारी म्हणून नांदेड येथील पथक तिनही नागरीकांना घेवुन पुढील तपासणी व पडताळणी कामी नांदेड येथे रवाना झाले.
या घटनेची कोणतीही सत्यता न पडताळता जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण होईल अशापध्दतीने चंद्रपूर येथील खबरकट्टा या वेब न्युज पोर्टल वर काल दिनांक 7 मे 2020 रोजी दुपारी दरम्यान 'आताची ब्रेकींग न्युज: चंद्रपुरात सापडले 3 कोरोना पॉझिटिव्ह या मथळ्याखाली बातमी प्रसारीत केली. या बातमीमुळे चंद्रपर येथील जनतेमध्ये व प्रसारमाध्यमांध्ये अफवा पसरुन एकप्रकारे संभ्रमाचे व भितीचे वातावरण निर्माण झाले. कोवीड 19 च्या संदर्भात अशाप्रकारे चुकीच्या बातम्या,अफवा पसरवू नये. या करीता शासनाने यापुर्वी वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले आहेत. तसेच चंद्रपुर पोलीस विभागाने सुध्दा याबाबत वेळोवेळी आवाहन केलेले आहे.
खबरकट्टा वेब न्युज पोर्टल वर प्रसारीत करण्यात आलेल्या या चुकीच्या बातमी करिता पोलीस स्टेशन राजुरा येथे अपराध क्र.285/2020 कलम 188,505(1)(ब),505(2)भादंवि सह कलम 52,54 आपत्ती व्यवस्थापन अधिनीयम अन्वये सबंधित न्युज पोर्टलचे सपादक यांचेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे.पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
सर्व नागरीकांना तसेच प्रसार माध्यमांना पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांचेकडुन निर्देशित करण्यात येत आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्याचप्रमाणे जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण होईल अशाप्रकारे संदेश किंवा माहीती खात्री झाल्याशिवाय प्रसारीत करु नये. असे आढळून आल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास कायेदशिर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी निर्गमित केले आहेत.
000000
No comments:
Post a Comment