Search This Blog

Friday 1 May 2020

चंद्रपूर येथे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण


कोरोना विरूध्दच्या लढयात सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन

         चंद्रपूर दि 01 मे : चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज महाराष्ट्र दिनाला राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कोरोना विरुद्धच्या लढयात सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
       कोरोना आजाराच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मर्यादित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुलेजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले प्रामुख्याने उपस्थित होते.
         ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील जनतेला व्हिडिओ संदेश देताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात ज्या थोर विभूतींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांना अभिवादन केले. जिल्ह्यातील समस्त जनतेला त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावर कोरोना आजाराचे संकट असताना एकत्रित प्रयत्नातून या आजारावर विजय मिळविण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयाअसे आवाहन त्यांनी केले.
          जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे आगामी काळात देखील प्रशासनासोबत प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घेत जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव होणार नाहीयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
         याकाळात रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरशहरांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्ष असणारे पोलीस व उपाययोजना करणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला नागरिकांनी सहकार्य करावे. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन देखील त्यांनी केले.
       जिल्हा बाहेर असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनाविद्यार्थ्यांनाप्रवाशांना मजुरांना जिल्ह्यामध्ये आणण्याचे मोठे काम आगामी काळात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून होणार आहे. या काळात शारीरिक अंतर ठेवत अतिशय बारकाईने स्थलांतरितांचा गुंता सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 0000000

No comments:

Post a Comment